‘ई ग्राम ॲप' ठरते आहे ग्रामपंचायतींसाठी उपयुक्त 

राष्ट्रीय पंचायतराज दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील निवडक सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
e-gram
e-gram

पुणे : राष्ट्रीय पंचायतराज दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील निवडक सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील ॲग्रोवन ई ग्राम ॲप वापरणाऱ्या मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका मेदनकर यांनाही या उपक्रमात सहभागाची संधी मिळाली. मेदनकर यांनी पंतप्रधानांशी आत्मविश्वासाने साधलेल्या संवादाची राज्याच्या ग्रामविकास क्षेत्रात चर्चा सुरु आहे.  मेदनकरवाडी ग्रामपंचायत कामकाजासाठी ॲग्रोवन ई ग्राम ॲपचा वापर करत आहे. पंतप्रधानाशी बोलताना मेदनकर यांनी गावातील विविध उपक्रमांची आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ॲग्रोवन ई ग्राम ॲपच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांच्या या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. सध्या कोरोना व्हायरस बद्दल जनजागृती करण्यासाठीही ई ग्राम ॲपचा वापर केला जातो आहे. कोरोना व्हायरस बद्दलची खरी माहिती ॲपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली जाते. या ॲपच्या माध्यमातून गावातील व्यक्तींचे आरोग्य सर्वेक्षण देखील करता येते. या ॲपच्या माध्यमातून गावातील करभरणा, पाणीपट्टी, घरपट्टी देखील डिजिटल माध्यमातून भरण्याची व्यवस्था आहे. गावाच्या विकासात ई ग्राम ॲपचा मोठा फायदा झाल्याची माहिती सरपंच प्रियांका मेदनकर यांनी दिली आहे.  या ॲपमधील ऑनलाईन ग्रामसभा प्रणाली, ऑनलाईन तक्रार, गावातील घडामोडी, शासकीय योजना आणि दाखले, कृषीविषयक, आरोग्य आणि शिक्षण, बचतगट हे टॅब सुद्धा ग्रामविकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. प्रशासन आणि नागरीक या दोघांनाही हे ॲप अतिशय उपयुक्त आहे. या दोन्ही घटकांतील दुवा म्हणून ॲग्रोवन ई ग्राम ॲप महत्वाची भूमिका पार पाडते.  ‘फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून आज संवाद  रविवार (२६ एप्रिल) मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियांका मेदनकर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधणार संवाद साधणार आहेत. ॲग्रोवन ई ग्रामच्या फेसबुक पेजवर रविवारी सायंकाळी सहा वाजता त्या संवाद साधतील. या लाईव्हमध्ये सहभागी होऊन प्रियांका यांच्याशी संवाद साधता येईल व त्यांना प्रश्नही विचारता येतील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com