तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी गुरूवारी इ-मेल आंदोलन 

भारतात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाईड) बियाण्यांनापरवानगी मिळवी यासाठी शेतकरी संघटनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंधीत मंत्र्यांना इ-मेल पाठवण्याचे आंदोलन जाहीर केले आहे.
तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी गुरूवारी इ-मेल आंदोलन 
तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी गुरूवारी इ-मेल आंदोलन 

नगर : भारतात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाईड) बियाण्यांनापरवानगी मिळवी यासाठी शेतकरी संघटनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंधीत मंत्र्यांना इ-मेल पाठवण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. गुरूवारी (ता.२८) स्व. अजित नरदे य‍ांच्या पहिल्या जयंतीच्या दिवशी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. आठ दिवसांत सरकारने ‘जीएम’ बियाण्यांना परवानगी दिली नाही, तर त्या नंतर ‘मै भी गुनेहगार’ आंदोलन देशभर सुरु करण्यात येइल, असे घनवट म्हणाले.  अनिल घनवट यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जगभरामध्ये जनुकी सुधारीत बियाणे वापरले जाते व त्या आधारे कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन घेतले जात आहे. भारतात मात्र फक्त कापसाच्या बीजी २ या जीएम वाणानंतर कोणत्याही वाणास किंवा पिकाच्या जीएम बियाण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. कपाशीमध्ये तणनाशक रोधक बियाणे उपलब्ध आहे व जगभरातील शेतकरी त्याची पेरणी करतात. तणनाशक रोधक असल्यामुळे तणनाशकाच्या एका फवारणीने तणांचा बंदोबस्त होतो व खुरपणीचा हजारो रुपयांचा खर्च वाचतो. उत्पादनही चांगले येते. भारतात मात्र हे बियाणे वापरण्यास बंदी आहे.  मागील वर्षी शेतकरी संघटनेने तण नाशकरोधक कापूस बियाण्याची जाहीर लागवड करत किसान सत्याग्रह करुन सविनय कायदेभंग केला होता. सरकारला जीएम पिकांना परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या वर्षीही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी (ता.२८) शेतकरी संघटनेचे नेते स्व. अजित नरदे यांच्या जयंतीच्या दिवशी शेतकरी, पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पर्यावरण मंत्री व गृह मंत्र्यांना इ-मेल पाठवून जीएम पिकांना परवानगी देण्याची मागणी करणार आहेत. हजारो शेतकरी वरील मंत्र्यांना इ-मेल पाठवून विनंती करणार आहेत.  जर आठ दिवसांत सरकारने जीएम बियाण्यांना परवानगी दिली नाही तर त्या नंतर ‘मै भी गुनेहगार’ आंदोलन देशभर सुरु करण्यात येईल. या आंदोलनात शेतकरी जाहीरपणे जीएम कापूस, सोयाबीन, मका, वांगी, मोहरी या पिकांच्या लागवडी करतील व प्रशासनाला कळवतील. शेतकरी आपल्या शेतात ‘मी जीएम शेतकरी, मै भी गुनेहगार’ असेही फलक लावतील.  याबाबत माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशिकर, मधुसुदन हरणे, सचिन गोविंद जोशी, सतीष दाणी, ललित बहाळे, विजय निवल, गुणवंत पाटील, राम नेवले, सचिन डाफे, विनोद दुबे, आदी नेत्यांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत निर्णय घेतला आहे, असे घनवट यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com