agriculture news in Marathi e-Nam only for formality in Mumbi APMC Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुंबई बाजार समितीत ‘ई-नाम’ नावापुरतेच 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 मे 2020

शेतकऱ्यांना ऑनलाइन आपला माल विकता यावा आणि व्यापाऱ्यांना ऑनलाइन व्यापार करता यावा. त्याचबरोबर यामार्फत सर्व बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या जाऊन व्यापार वाढावा, यासाठी सरकारने ‘ई-नाम’ व्यापारपद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरु केला होता.

मुंबई: शेतकऱ्यांना ऑनलाइन आपला माल विकता यावा आणि व्यापाऱ्यांना ऑनलाइन व्यापार करता यावा. त्याचबरोबर यामार्फत सर्व बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या जाऊन व्यापार वाढावा, यासाठी सरकारने ‘ई-नाम’ व्यापारपद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरु केला होता. यासाठी सर्व प्रकारच्या सुविधाही बाजार समितीने दिल्या. आताच्या लॉकडाउनच्या काळात इतर बाजार समितींमध्ये या ‘ई-नाम’ कार्यप्रणालीचा वापर वाढला आहे, मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ‘ई-नाम’चा वापर केलाच जात नसल्याने ही कार्यप्रणाली नावापुरतीच उरली आहे. 

कृषी मालाच्या विक्रीकरिता, एक राष्ट्र एक व्यापार, या संकल्पनेवर ‘ई-नाम’ ही व्यापारपद्धती आधारित आहे. याद्वारे राज्यातीलच नाही, तर देशातील सर्व ५८५ बाजारपेठा एकत्र जोडल्या गेल्या आहेत. येथे नोंदणी करून व्यापारी, शेतकरी यांना आपला माल ऑनलाइन पद्धतीने खरेदी-विक्री करता येतो. याद्वारे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना बाजारात येण्याचीही गरज नाही.

माल विकल्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या मालाचे पैसे त्याच्या खात्यात जमा होतात. सध्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये ‘ई-नाम’ कार्यप्रणालीचा वापर वाढायला सुरुवात झाली आहे. अनेक व्यापारी, शेतकरी व्यापार करताना ‘ई-नाम’ कार्यप्रणालीचा वापर करत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या मोठ्या बाजारपेठेत आजही या पद्धतीने व्यापार करण्यास व्यापाऱ्यांकडून नापसंतीच दर्शवली जात आहे. त्यामुळे ‘ई-नाम’ कार्यप्रणालीला येथे कोणताच प्रतिसाद मिळत नाही. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दहा टक्के कृषिमाल थेट शेतकऱ्यांकडून येतो. बाकी ९० टक्के कृषिमाल हा व्यापारी अडते, दलाल यांच्यामार्फत बाजार समितीत येत असतो. येथे व्यापारी, दलाल यांच्यात जास्त व्यापार चालतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांचा तसा थेट संबंध येत नसल्याने त्यांच्याकडून ‘ई-नाम’ अंतर्गत व्यापार केला जात नाही.

महत्त्वाचे म्हणजे ‘ई-नाम’साठी नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यांच्याकडूनही तसा व्यापार अजून सुरु झाला नसल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून मिळाली. त्यामुळे इतर ठिकाणी ‘ई-नाम’ला चांगला प्रतिसाद मिळत असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र ‘ई-नाम’च्या बाबतीत मागे राहिली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...