ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

शेतकरी व नागरिकांना महसूल विभागाच्या सुविधा पारदर्शीपणे व सुलभतेने देण्यासाठी ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामुळे महसूल व कृषी विभागाच्या कामकाजात सुसूत्रता येईल. - अब्दुल सत्तार, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री
pik pahni
pik pahni

सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची किती पेरणी झाली याविषयीची माहिती वेळेत जाणून घेण्याच्या दृष्टीने ई-पीक पाहणी प्रकल्पाची रब्बी हंगामासाठीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. टाटा ट्रस्टच्या तांत्रिक मार्गदर्शनातून हा ई-पीक पाहणी प्रकल्प राबविला जात आहे.  या प्रकल्पात लोकसहभाग हा महत्त्वाचा भाग आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून पिकांची ऑनलाइन पाहणी करण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांनाच आपल्या पेरलेल्या पिकांची ऑनलाइन माहिती फोटोसह नोंदविता येणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्याने अशी माहिती नोंदविल्यानंतर तलाठ्याला त्याची पडताळणी करून ते सातबाऱ्यावर ऑनलाइन तत्परतेने नोंद करणे शक्‍य होणार आहे.  यंदा रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, परभणी जिल्ह्यांतील सेलू तालुक्‍याची प्रायोगिक तत्त्वावर ई-पीक पाहणी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाची सुरुवात सिल्लोड तालुक्‍यात नुकत्याच आयोजित केलेल्या ई-पीक पाहणी कार्यशाळेच्या माध्यमातून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रकल्प सल्लागार नरेंद्र कवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, संभाजी कडू, प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सेलूचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, तहसीलदार रामेश्वर गोरे, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी, नायब तहसीलदार संजय सोनवणे, किरण कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सिल्लोड तालुक्‍यात हा प्रकल्प राबविण्यासाठी आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांकडून त्यांच्या पेरणी केलेल्या पिकाची माहिती ई-पीक पाहणीच्या माध्यमातून भरून घेणार आहेत. ई-पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत तालुक्‍यातील महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ई-पीक पाहणीसंदर्भात प्रशिक्षण देण्याचे कामही केले जात आहे.  असा ई-पीक पाहणी प्रकल्प ई-पीक पाहणी प्रकल्पात ॲपच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांनाच आपल्या पेरलेल्या पिकांची ऑनलाइन माहिती फोटोसह नोंदविता येणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्याने अशी माहिती नोंदविल्यानंतर तलाठ्याला त्याची पडताळणी करून ते सातबाऱ्यावर ऑनलाइन तत्परतेने नोंद करणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्यांची पीकपाहणी तसेच रेकॉर्डमध्ये सुलभता येऊन महसूल विभागाची कामे सोप्या पद्धतीने होणे ई-पीक पाहणी प्रकल्पातून अपेक्षित आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com