Agriculture news in Marathi E-pocket book useful for farming techniques | Page 3 ||| Agrowon

शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगी

सुदर्शन सुतार
शनिवार, 12 जून 2021

उस्मानाबादच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तरुण कृषी अधिकारी सचिन पांचाळ यांनी तयार केलेल्या कृषिविषयक ई-मोबाईल पॉकेट बुक आणि साहित्यनिर्मितीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

सोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची व योजनांची माहिती होण्याच्या दृष्टीने मोबाईलचा अत्यंत प्रभावी वापर करता येऊ शकतो, याची प्रचिती लॉकडाउन कालावधीत येत आहे. उस्मानाबादच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तरुण कृषी अधिकारी सचिन पांचाळ यांनी तयार केलेल्या कृषिविषयक ई-मोबाईल पॉकेट बुक आणि साहित्यनिर्मितीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून, विस्तार कार्यात या साहित्याचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

तरुण शेतकऱ्यांना कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञान जसे की माती परीक्षण, जैविक खतांचा वापर, बीजप्रक्रिया, बी.बी.एफ. यंत्राद्वारे पेरणी, खतांचा प्रभावी वापर, निंबोळी अर्काचा उपयोग, कीड-रोग व्यवस्थापन, जैविक कीटकनाशक, कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बीजोत्पादन, गांडूळ खतनिर्मिती अशा हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना समजेल, अशा भाषेमध्ये पांचाळ यांनी पी.डी.एफ. स्वरूपात ई-मोबाईल पॉकेट बुक तयार केले आहे. 

प्रत्येक विषयाशी संबंधित क्यू.आर. कोड व वन टच व्हिडिओ प्ले सुविधा दिल्याने यू-ट्यूब वरील माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू होतो. तसेच प्रिंट कॉपी करता क्यू.आर. कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून व्हिडिओ बघता येतो. त्यामुळे तंत्रज्ञान समजण्यास मदत होते आहे, अशा पद्धतीने तीन मोबाईल ई-पॉकेट बुक आणि ८९ प्रकारच्या माहितीपत्रिकेची निर्मिती पांचाळ यांनी केली आहे. त्याचबरोबर ३८ व्हिडिओही त्यांनी तयार केले आहेत. प्रत्येक गावाकरिता व्हॉट्‌सअॅपचे ग्रुप तयार करून त्यामध्ये ते प्रसारित करण्यात येत आहेत. आजपर्यंत साधारण ५० हजारांवर शेतकऱ्यांनी ही ई- बुक वाचली आहेत.

आजकाल प्रत्येक घरामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार ई-बुकच्या माध्यमातून करता येतो, हे लक्षात आल्याने हा प्रयोग सुरू केला. यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन, मोलाचे ठरले. 
- सचिन पांचाळ, 
कृषी अधिकारी, पोकरा, उस्मानाबाद


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....