मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
सांगलीत जनावरांचे ई-टॅगिंग रखडणार
तासगाव तालुक्यातील तब्बल सव्वा लाख जनावरांचे ई-टॅगिंग होणार आहे. येत्या डिसेंबरअखेर ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे, मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही मोहीम लांबण्याची शक्यता आहे.
सांगली (प्रतिनिधी) : तासगाव तालुक्यातील तब्बल सव्वा लाख जनावरांचे ई-टॅगिंग होणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर जनावरांच्या लसीकरणासह विविध योजनांची माहिती शेतकऱ्याला उपलब्ध होणार आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या डिसेंबरअखेर ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे, मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही मोहीम लांबण्याची शक्यता आहे.
दुग्धपालन, खत आणि शेतीच्या कामासाठी दारात पाळीव जनावर असावे, अशी सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा असते. त्यामुळे शेळीपासून ते गाय, म्हैस, बैल या जनावरांचे पालन शेतकरी करीत असतो, मात्र या जनावरांच्या वर्षभरात कोणत्या साथी येतात, त्यांना कोणती लस द्यायची, याची माहिती शेतकऱ्यांजवळ नसते. तसेच गाय व म्हैस गाभण गेल्यानंतर त्याची तारीख अनेकांजवळ उपलब्ध नसते.
विविध शासकीय योजना व जनावरांसाठी उपलब्ध असलेले अनुदान या बाबतही बऱ्याच जणांना माहिती नसते, मात्र आता शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पाळीव जनावरांसाठी एक मोहीम राबविली आहे. त्या नुसार आता प्रत्येक जनावराला आधार कार्ड उपलब्ध होणार आहे.
चौकोनी बिल्यासारखे जनावराच्या कानाला कायमस्वरूपी (टॅगिंग) लावण्यात येणार आहे. हे डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ एका क्लिकवर आपल्या जनावराची माहिती उपलब्ध होणार आहे.
तासगावात मनुष्यबळ कमी
तासगाव तालुक्यात महाराष्ट्र शासनाची १३ व जिल्हा परिषदेचे ४ असे १७ दवाखाने आहेत, तर २०१२च्या पशुगणनेनुसार एकूण म्हशी ७८ हजार ५५८ व गाई ४० हजारांच्या आसपास आहेत, मात्र कर्मचारी अवघे सात आहेत. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग कसे होणार, असा प्रश्न आहे. दररोज किमान पन्नास जनावरांचे टॅगिंग होते. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंतच जनावरे सापडतात. तालुक्यातील पंचवीस हजारांच्या आसपास जनावरांचे टॅगिंग व लसीकरण झाले आहे. त्यामुळे कर्मचारी अपुरे असल्याने डिसेंबरअखेर पूर्ण कसे होणार, या बाबत मात्र अधिकाऱ्यांकडे ठोस उत्तर नाही.
प्रतिक्रिया
इनपच्या माध्यमातून शासनाने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या मधून जनावरांची ओळख त्याचबरोबर लसीकरण इतर शासकीय सुविधा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे तालुक्यातील खासगी पशुसेवा देणाऱ्या सर्वांची बैठक घेतली आहे. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांची मदत घेऊन हे काम लवकरच पूर्ण करू.
- डॉ. एम. बी. गवळी, सहायक आयुक्त
- 1 of 1029
- ››