खानदेशात अर्लीची केळी लागवड सुरू

जळगाव ः खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे एक हजार हेक्टरने वाढू शकते, असे संकेत आहेत.
Early in Khandesh Start planting bananas
Early in Khandesh Start planting bananas

जळगाव ः खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे एक हजार हेक्टरने वाढू शकते, असे संकेत आहेत. 

केळीचे दर यंदा टिकून आहेत. इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे. कारण, दर कमी अधिक झाले. केळी पीक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी परवडले. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले. जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू होते. तर, कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या मृग बहर केळीची काढणी सुरू आहे. या केळीला किमान ७०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. 

मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते. अर्ली लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तर नियमित लागवड जूनपासून सुरू होते. खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. 

मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. खानदेशात गेल्या हंगामात मृग बहर केळीची लागवड सुमारे ४१ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा ही लागवड सुमारे ४२००० ते ४२५०० हेक्टरवर होवू शकते. 

रोपांभोवती धैंचा, तागाची लागवड 

या केळीसाठी शेतकरी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग करीत आहेत. ही रोपे खानदेशात विविध कंपन्यांतर्फे पुरविली जात आहे. रोपांचा पुरवठा सुरळीत आहे. जागेवर १४ ते १५ रुपये प्रतिरोप, असे दर मिळत आहेत. रोपांच्या चांगल्या उगवणक्षमतेसाठी शेतकरी रोपांभोवती धैंचा, तागाची लागवड करीत आहेत. यामुळे उष्णतेपासून रोपांचे संरक्षण होत आहे. अर्ली मृग बहर केळी लागवड रावेर, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा भागात सुरू आहे. जूनमध्ये लागवडीला आणखी वेग येईल, असे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com