agriculture news in marathi, earth saved from meteor | Agrowon

शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वी
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

पुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ तर्फे वातावरणाला स्पर्शून जाणाऱ्या उल्केचे छायाचित्र शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी ही महाकाय उल्का प्रशांत महासागरातील बेअरिंग समुद्रावरील आकाशात दिसल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले.

पुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ तर्फे वातावरणाला स्पर्शून जाणाऱ्या उल्केचे छायाचित्र शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी ही महाकाय उल्का प्रशांत महासागरातील बेअरिंग समुद्रावरील आकाशात दिसल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले.

या उल्केमध्ये सुमारे १७३ किलोटन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद होती. या ऊर्जेची तुलना करायची झाल्यास दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर टाकलेल्या 
अणुबॉम्बच्या दहा पट ठरेल ! वातावरणात विघटित झाल्यानंतर काही मिनिटांतच उल्केच्या शेपटीचे छायाचित्र टिपण्यात उपग्रहाला यश मिळाले होते. उल्केच्या घर्षणामुळे हवेतील तापमानात प्रचंड वाढ झाली. यामुळे आसपासच्या ढगांचा रंग नारंगी झाला होता. त्यामुळे नासाच्या ‘टेरा’ या उपग्रहाला छायाचित्र मिळवणे 
सोपे झाले.

अवकाशात लहान, मोठे खडकाचे तुकडे फिरत असतात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच हवेच्या घर्षणामुळे त्यांचे ज्वलन होते. अशा खडकांच्या तुकड्यांना ‘उल्का’, असे म्हटले जाते. यापूर्वी अनेक उल्कापात झाले आहेत. रशियातील चेल्याबिंस्क शहरात २०१३ मध्ये उल्कापात झाला होता. ४४० किलोटनाच्या उल्केमुळे एक हजार ५०० लोक जखमी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...