Agriculture news in Marathi In East Vidarbha, safflower will be planted on 4,000 hectares | Page 2 ||| Agrowon

पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार हेक्‍टरवर लागवड

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता आयात करावी लागते. त्यावर मोठे परकीय चलनही खर्च होते. ही बाब गांभीर्याने घेत पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये तेलवर्गीय करडई लागवडीला कृषी विभाग, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाजोती) अभियानातून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता आयात करावी लागते. त्यावर मोठे परकीय चलनही खर्च होते. ही बाब गांभीर्याने घेत पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये तेलवर्गीय करडई लागवडीला कृषी विभाग, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाजोती) अभियानातून प्रोत्साहन देण्यात आले आहे. तेलबियावर्गीय पिकांसाठी नवख्या असलेल्या या भागात या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून बळ दिले जात असून यंदा चार जिल्ह्यांत सुमारे चार हजार हेक्‍टरवर करडई लागवड होणार आहे. 

सद्यःस्थितीत खाद्यतेलाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण नाही. परिणामी, ७० हजार कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात करावी लागते. विदर्भ करडई, जवस, भुईमूग, तीळ, मोहरी या तेलवर्गीय पिकांसाठी कधी काळी ओळखला जाता होता. परंतु करडई कापणीवेळी मजुरांच्या हातांना काट्यांमुळे होणाऱ्या जखमा, तर इतर तेलवर्गीय पिकांना वन्यप्राण्यांकडून नुकसानीची भीती, दरातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे तेलबिया पिकांखालील क्षेत्र कमी होत गेले.

 करडई लागवडीच्या तांत्रिक बाबी 
एकरी चार किलो बियाणे, लागवडीपूर्वी एक रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे, दुसऱ्या दिवशी वाळवून, बुरशीनाशक तसेच ॲझोटोबॅक्‍टर यांची बीजप्रक्रिया करून लागवड करावी, पाच सेंटिमीटरपेक्षा अधिक खोल बियाणे पडू नये, पुरेशी ओल असावी, मावा व अन्य किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट, ॲसाफेटची फवारणी करावी, दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित ओलित करावे, अति पाणी देण्याचे टाळावे.

महाजोतीच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या या प्रकल्पात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन केंद्राचे तांत्रिक सहकार्य आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. त्याच्याच परिणामी वर्धा जिल्ह्यात ४२५, चंद्रपूर १८००, गडचिरोली १०००, तर नागपूर जिल्ह्यात २५४ हेक्‍टरवर करडई लागवडीकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना बियाणे व निविष्ठांचा पुरवठा प्रकल्पातून होईल. शेतकऱ्यांना तेलबियावर्गीय पिकांकडे वळविण्याचे या अभियानातून प्रस्तावीत असून, त्याला बऱ्याच अंशी यश आले आहे. 
- रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...