agriculture news in marathi, The eastern part of jat is deprived from 'Mhaysal' | Agrowon

‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचित
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला म्हैसाळ उपसा सिंचन योजने पाणी द्या, अशी मागणी शेतकरी गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. मात्र, अद्यापही या गावांना योजनेचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला म्हैसाळ उपसा सिंचन योजने पाणी द्या, अशी मागणी शेतकरी गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. मात्र, अद्यापही या गावांना योजनेचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला १९८२ साली मंजुरी मिळाली. योजनेचे भूमिपूजन सन १९८४ साली करण्यात आले. त्यानंतर शासनाने १९९५ मध्ये सुधारित योजनेमध्ये ६ व्या टप्प्यात जत तालुक्याचा या योजनेत समाविष्ट केला. तालुक्याच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागात पाणी आले. परंतु, पूर्व भागातील ६४ गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून या भागातील जनता पाण्याची मागणी करत आहे. परंतु, अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत.

जत पूर्व भागातील ६४ गावांतील सुमारे ९० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुका आल्या की, तुम्हाला म्हैसाळचे पाणी देतो, असे सांगून मते घेतात. त्यानंतर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे, ही जणू परंपराच सुरू आहे. 

पूर्व भागातील सनमडी गावात म्हैसाळचे पाणी आले आहे. तेथून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात पाणी गेले आहे. सरकारने दहा किलोमीटरचा कालवा खुदाई केल्यास पूर्व भागातील तलाव पावसाळ्यात सायफन पध्दतीने भरून घेता येणे शक्य आहे. 

इतर बातम्या
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...