मिरज पूर्व भागाला पाणीपट्टी भरूनही पाणी मिळेना

आरग, जि. सांगली ः नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी म्हैसाळ योजना साडे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली. पण या वर्षी मिरज पूर्व भागातील शेतकरी अद्याप पाण्यापासून वंचित आहे. योजनेची एकरी दोन हजारे प्रमाणे पाणी पट्टी भरून सुद्धा पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती झाल्यामुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.
The eastern part of Miraj was flooded but no water was available

पूर्व भागात लोकप्रतिनिधींनी दौरा केला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दोन चार दिवसांत पाणी सोडण्याची पोकळ आश्वासने देण्यात आली. पण महिना उलटला तरी अद्याप पाणी शिवारात आले नाही. गावातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पण अद्याप पाणी आले नाही. पाणी येणार या आशेवर शेतकरी जगत आहे.

वाढत्या तापमानामुळे या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिना संपत आला तरी पाण्यासाठी घसा कोरडाच आहे. पूर्व भागातील संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अखेर कोरड्याच राहिल्या. योजना गावाच्या दाराशी आहे. पण पिण्यासाठी पाणी नाही. भूजल पातळी खालावली. पिके करपली तसेच शेतीसाठी पाण्याची गरज आता आहे. पण पावसाळ्यात महापुराचे पाणी घेऊन काय करायचे, असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहे. कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीमध्ये येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली जात असून पूर्व भागात दौरा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या कडून फक्त बघ्याची भूमिका होत आहे.

मे महिना लोटला तरी पाणी सोडण्यात आले नाही. पाण्यासाठी समस्येत वाढ होत असून पूर्व भागाला कोणी वाली आहे का नाही. आता आम्हाला आक्रमक होण्याशिवाय पर्याय नाही. होरपळलेल्या पिकांना आधार देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आमची आहे. - दाजी खोत, माजी सरपंच, लक्ष्मिवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com