agriculture news in marathi The economic cycle will continue as we fight Corona Take care of this: Guardian Minister Bhujbal | Agrowon

कोरोना’शी लढताना अर्थचक्र सुरू राहील याची दक्षता घ्या ः पालकमंत्री भुजबळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

नाशिक : कोरोनाची लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. यात शासन, प्रशासनासमोर दोन प्रकारची आव्हाने आहेत. संसर्ग नियंत्रणात आणण्यासोबत सर्व प्रकारचे व्यवहार सुरू ठेवून अर्थचक्र कसे सुरळीत चालू राहील, याची दक्षता घ्यावी , अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. 

नाशिक : कोरोनाची लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. यात शासन, प्रशासनासमोर दोन प्रकारची आव्हाने आहेत. संसर्ग नियंत्रणात आणण्यासोबत सर्व प्रकारचे व्यवहार सुरू ठेवून अर्थचक्र कसे सुरळीत चालू राहील, याची दक्षता घ्यावी , अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार (ता.७) झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, आरोग्य उपसंचालक पट्टनशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. 

मंत्री भुजबळ म्हणाले, ‘‘कोरोना ग्रामीण भागातही पोहोचला आहे. तो जास्त पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांबाबत गर्दी टाळता येईल व नागरिकांचीही सोय होईल, असा निर्णय पोलिस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा.’’ उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व त्यावरील उपाययोजनांची माहिती सादर केली. 

जबाबदाऱ्या केल्या निश्चित 

कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरातील बाधित क्षेत्रावर महापालिका आयुक्त, तर येवला तालुका व परिसरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत करुन समन्वयकाची भूमिका पार पाडावी, असे भुजबळ यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात आढावा 

  • प्रलंबित स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल तात्काळ प्राप्त करा 
  • मालेगाव पाठोपाठ येवल्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमा 
  • दुकानांच्या वेळांबाबत गर्दी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने फेरविचार करावा 
  • कायद्याची अंमलबजावणीवेळी स्थलांतरितांना मानवतेची वागणूक द्या 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...