Agriculture news in Marathi The economic maths of farmers collapsed due to lack of milk prices | Agrowon

पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला चांगली मागणी असूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. दुसरीकडे चारा आणि पशुखाद्याच्या किमती वाढल्याने दुग्धोत्पादन शेतकरी अधिकच अडचणीत आले आहे.

पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला चांगली मागणी असूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. दुसरीकडे चारा आणि पशुखाद्याच्या किमती वाढल्याने दुग्धोत्पादन शेतकरी अधिकच अडचणीत आले आहे.

पुणे जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे. विशेषतः आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात दुग्ध व्यवसाय वाढीस लागला आहे. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून पडल्याचे दिसून येते. सरकारने अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याचा थेट फायदा गावातील दूध उत्पादकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यात १०० हून अधिक खासगी दूध संघ आहेत. मात्र, या दूध संघांकडून गायीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

जिल्ह्यात गायीच्या दुधाचा दर २८ ते ३० रुपये लीटरपर्यंत होता. परंतु तो आता कमी होऊन १८ ते २४ रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हशीच्या दुधासाठी ३० ते ३५ रुपये दर मिळत होता. परंतु, या दरातही चांगलीच घसरण झाल्याचे दिसून येते. त्यातही डेअरीला दूध घातल्यानंतर वेळेवर पेमेंट मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या सहकारी व खाजगी दूध संघांकडून गायीच्या दुधाला ३.५/८.५  फॅटसाठी १८ ते २४ रुपये प्रति लीटर असा दर दिला जात आहे. हे संघ मातीमोल दराने दूध खरेदी करून उत्पादकांची फसवणूक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

पशुखाद्याचे दर वाढलेलेच
पशुखाद्याचे एक पोते (५० किलो) १२०० ते १४०० रुपयांप्रमाणे खरेदी करावे लागत आहे. खापरी पेंडचा दर २२०० ते २४०० रुपये  प्रति ५० किलो, मक्याचा भरडा ८०० ते ९०० रुपये प्रति ५० किलो याप्रमाणे खरेदी करावा लागत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यांचा मेळ घालण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

सरकारने म्हशीच्या दुधाला ६० रुपये तर गायीच्या दुधाला किमान ४०  रुपये दर द्यावा. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांच्या कालावधीकरिता दुधाला १० रुपये प्रतिलीटर अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करावे. तरच शेतकऱ्यांचा थोड्याफार प्रमाणात तोटा  भरून निघेल.
- घनश्याम तोडकर, शेतकरी, तळेगाव ढमढेरे, जि. पुणे


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...