agriculture news in marathi, Economic problem of Khandesh farmers | Agrowon

जिल्हा परिषद अध्यक्षांसह संचालकांवर ठपका
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

सोलापूर : कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाजाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि कुर्डुवाडी बाजार समितीचे संचालक संजय शिंदे यांच्यासह संचालक व सचिवांच्या मनमानी कारभारामुळे बाजार समितीचे २० ते २५ कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा ठपका चौकशी अधिकारी विजय पाखले यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय समितीने ठेवला आहे. या संदर्भातील माहिती तक्रारदार संजय कोकाटे यांनी शुक्रवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर : कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाजाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि कुर्डुवाडी बाजार समितीचे संचालक संजय शिंदे यांच्यासह संचालक व सचिवांच्या मनमानी कारभारामुळे बाजार समितीचे २० ते २५ कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा ठपका चौकशी अधिकारी विजय पाखले यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय समितीने ठेवला आहे. या संदर्भातील माहिती तक्रारदार संजय कोकाटे यांनी शुक्रवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत दिली.

कोकाटे म्हणाले, ‘‘शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या दबावामुळे तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. पण, सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे चौकशी अधिकारी नियुक्त केले. त्यांनी चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकाकडे सादर केला आहे. संस्थेने चारा छावणी उभारताना अनेक चुका केल्या. त्यामुळे समितीला नाहक दंड भरावा लागला. या व इतर प्रकरणामुळे सुमारे २० ते २५ कोटी रुपयांचे सरकारी नुकसान झाले
आहे.``

‘‘बाजार समितीचे संचालक व सचिवांनी त्यांचे नातेवाईक व संबंधितांना अत्यल्प भाड्याने गाळे दिले. त्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. कोणत्याही परवानग्या न घेता बाजार समितीच्या जागांवर गाळे बांधण्यात आले आहेत. त्या जागांची व बांधकामाची नोंदही नाही. बांधकाम न केलेल्या संस्थांना मोठ्या रकमा देऊन गैरव्यवहार केल्याचा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला आहे``, असे कोकाटे यांनी सांगितले.

या प्रकरणाची चौकशी पाखले यांच्यासह लेखापरीक्षक एम. सी. मुंडासे, उपलेखा परीक्षक एस. बी. शिंगाडे व अप्पर विशेष लेखापरीक्षक जी. पी. पोतदार यांनी केली. मी केलेल्या नऊ तक्रारींत तथ्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. चौकशी अहवालाची दखल घेऊन सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा त्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही कोकाटे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...