Agriculture news in Marathi, Economic slowdown threatens agriculture sector in the country: Sharad Pawar | Agrowon

आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला धोका ः शरद पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात नाही. शेतीवर आधारित समाज घटक नागवला जात आहे. त्यामुळे देशातील शेती क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे. या सरकारच्या काळात किती कारखाने बंद पडले. पाच वर्षांत काय काम केले ते सरकारने सांगावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १९) नांदेड येथे केली.

नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात नाही. शेतीवर आधारित समाज घटक नागवला जात आहे. त्यामुळे देशातील शेती क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे. या सरकारच्या काळात किती कारखाने बंद पडले. पाच वर्षांत काय काम केले ते सरकारने सांगावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १९) नांदेड येथे केली.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये गुरुवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये श्री. पवार बोलत होते. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आमदार प्रदीप नाईक, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब, नागनाथराव रावणगावकर, प्रदेश उपाध्यक्ष महम्मद खान पठाण, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम आदी उपस्थित होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, ‘‘सध्या बाजारातील मंदीमुळे हजारो लोकांचा रोजगार गेला. शेकडो कारखाने बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. तरुणांच्या हाताला कामे राहिली नाहीत. मराठवाड्यातील तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. आपल्या काळात औरंगाबादला उद्योगपती बजाज यांना कारखाना सुरू करण्यास भाग पाडले. या भागात कारखानदारी उभी झाली. दुष्काळी भागातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळाले. नाशिकमधील कारखाने, मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत.’’


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...