Agriculture news in marathi, The economy of the farmers collapsed due to rain | Agrowon

मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१ मंडळांत मंगळवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत हलका ते जोरदार पाऊस झाला. जालना, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यांतील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सततच्या पावसामुळे शेतामध्ये कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. ज्वारीची कणसे काळी पडली. बोंडातून फुटलेला कापूस जमिनीवर गळून पडला. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. 

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१ मंडळांत मंगळवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत हलका ते जोरदार पाऊस झाला. जालना, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यांतील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सततच्या पावसामुळे शेतामध्ये कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. ज्वारीची कणसे काळी पडली. बोंडातून फुटलेला कापूस जमिनीवर गळून पडला. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. 

बोंडातील कापसाची वेचणी करणे कठीण झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, देगलूर, लोहा, मुखेड, कंधार, बिलोली, मुदखेड, नांदेड, भोकर, उमरी, धर्माबाद आदी तालुक्यातील अनेक मंडळे, परभणी तालुक्यातील पिंगळी मंडळातील कारेगाव, पूर्णा तालुक्यातील लिमला, ताडकळस, पूर्णा, चुडावा, कात्नेश्वर, सेलू तालुक्यातील सेलू, देऊळगाव, वालूर, चिकलठाणा, कुपटा, पाथरी तालुक्यातील पाथरी, हदगाव, पालम, गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ, परभणी तालुका, हिंगोली जिल्ह्यातील वसतम, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव, हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ३१, तर जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी आणि अंबड तालुक्यांतील वडीगोद्री मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३४, तर हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी ३, नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ४०, लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५१, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३५, तर बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ मंडळांत 
हलका ते जोरदार पाऊस झाला. वडवणी आणि कौडगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

मंडळनिहाय पाऊस (२० मि.मी पुढे) :

औरंगाबाद जिल्हा पाचोड २६, विहामांडवा ३६
जालना जिल्हा जालना २०, विरेगाव २५, पाचन वडगाव २०, वाग्रुळ जहागीर ३०, बावणे पांगरी २५, सिपोरा बाजार ३१, पिंपळगाव रेणुकाई ३०, केदारखेडा ४०, अनवा ४५, जाफराबाद ३७, टेंभुर्णी ७४, कुंभार झरी ४०, वरुड ३५, माहोरा ३८, परतूर  ३२, तळणी २३, जामखेड २०, वडीगोद्री ८१, गोंदी ४२, रोहिलगड २२, कुंभारपिंपळगाव २७, अंतरवेली ३४
परभणी जिल्हा सावंगी म्हाळसा २९, बामणी ७५, देऊळगाव ३५, गंगाखेड ३६, महातपुरी २०, आवलगाव २६, बनवस २०.
लातूर जिल्हा औसा २१, किल्लारी ३९, मातोळा २८ , पोहरगाव ३०, कारेपूर २६, नळगीर २५, नागलगाव २०, किनगाव २७, खंडाळी २५, चाकूर ९०, वडवळ नागनाथ ७४, नळेगाव २८, शेळगाव २२, कासार शिर्शी २९, मदनसुरी ३०, कासारबालकुंदा २१ 
उस्मानाबाद जिल्हा नळदुर्ग २०, मंगरुळ २०, इटकळ ४८, मुरुम २१, नागजरवाडी ३५, डाळिंब २४, 
माकणी २९, शिराढोण २५, 
गोविंदपूर २४ 
बीड जिल्हा बीड ४०, राजुरी ४४, मांजरसुंभा ५१, नेकनूर ३१, नाळवंडी ३७, पाली ३७, म्हळसजवळा २२, गेवराई ३०, धोंडराई ४२, उमापूर ५३, चकलंबा ४७, जातेगाव २०, सिरसदेवी २५, तिंतरणी २२, वडवणी ९८, कौडगाव १०३, माजलगाव ४२, गंगामसला ६०, दिंद्रुड २५, नित्रुड ५२, तालखेड ६०, किट्टी आडगाव ५०, केज ३५, विडा २२, बनसारोळा २२, धारुर ४४, मोहखेड ३६, तेलगाव ३९, परळी ४२, धर्मापुरी २०, पिंपळगाव गाढे २९.

 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...