agriculture news in Marathi, edge damage of krushna and Koyna river, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा नदीकाठ तुटला

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कृष्णा नदीकाठी माझी शेतजमीन आहे. नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाने माझी २० गुंठ्यांतील शेतजमीन सुमारे ३० फूट खोल अशी वाहून गेली आहे. अन्य शेतकऱ्यांचीही जमीन वाहिली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने भरपाई देऊन शेतकऱ्यांना उभे राहण्यास मदत करावी.  
- अजय घाडगे, शेतकरी, शिवडे

कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना आलेल्या महापुराबरोबर नदीकाठचे पात्रही वाहिल्याचे वास्तव पूर ओसरल्यानंतर समोर आले आहे. पुराच्या पाण्याच्या मोठ्या लोटाच्या प्रवाहाने नदीकाठही मोठ्या प्रमाणात तुटला असून त्यावरील जमीन पिकांसकट वाहून गेली आहे. पुराने अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवीनच संकट उभे राहिल्याने ते हवालदील झाले आहेत. नदीकाठची ही स्थिती मात्र नदीकाठावरील नागरी वस्त्यांना धोक्याची घंटाच ठरली आहे. 

सलग दोन आठवड्यापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले पाणी यामुळे कोयना-कृष्णा नद्यांना महापूर आला. त्यामुळे नदीकाठची पिके पूर्णतः पाण्यात गेली. त्यातच पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असल्याने पाण्याबरोबर नदीकाठची मळीची जमिनीही पिकांसकट वाहून गेली आहे. सलग पाच दिवसाहून अधिक काळ महापुराच्या फटक्यात जमीन वाहत राहिल्याने पूर ओसरल्यानंतर नदीची पाणी पातळी पूर्ववत होत असताना हे वास्तव समोर आले आहे. 

नदीकाठच्या मळीच्या शेतजमीनीही वाहिल्याने शेतकऱ्यांपुढे नवीनच संकट उभे राहिले आहे. अगोदरच पिके पाण्याखाली राहिल्याने ती हातची गेली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. त्यातच जमिनीबरोबर पिकेही वाहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नद्यांच्या काठी नदीपात्र तुटून ते नागरी वस्तीकडे सरकू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरी वस्त्यांनाही धोका निर्माण झाला असुन ती नागरी वस्तीसाठी धोक्याची घंटाच ठरली आहे.   

शेतीपंपांच्या मोटारीही वाहिल्या 
कोयना-कृष्णा नदीपात्रात ५ ते ९ ऑगस्टदरम्यान अचानक चौपटीने पाणी वाढले. त्यामुळे ते पाणी पात्राबाहेर येऊन नागरी वस्तीत घुसले. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपांच्या मोटरी काढायलाही संधी मिळाली नाही. पहिल्यांदाच पाणी अचानक मोठ्या प्रमाणात आल्याने मोटारी काढायला तिथपर्यंत जाताच आले नाही. त्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या मोटरीही वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानीच्या तुलनेत भरपाई द्या 
आत्तापर्यंत आलेल्या महापुरात यावेळचा महापूर मोठा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच पाण्यालाही मोठा वेग असल्याने त्याबरोबर नदीकाठची शेती पिकांसकट वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसानीच्या आकड्यांचा विचार करून त्या तुलनेत भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...
शेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये...
कृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू...नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी...
पुणे, मुंबई, नाशिक बाजार समित्या सुरू ...पुणे/मुंबई/नाशिक: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वादळी पाऊस, गारपिटीने राज्यात पिकांचे...पुणे : राज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता....
‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता...