अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या
अॅग्रो विशेष
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घट
खाद्यतेल आयात ११.६० टक्क्यांनी घटली असून, गेल्या वर्षीच्या १४९.१ लाख टनांच्या तुलनेत यंदा १३१.८ लाख टन आयात झाली आहे.
पुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये वनस्पती तेलाची आयात १३ टक्क्यांनी कमी होऊन १३५.३ लाख टन झाली आहे. गेल्या वर्षी १५५.५ लाख टन आयात झाली होती. तर खाद्यतेल आयात ११.६० टक्क्यांनी घटली असून, गेल्या वर्षीच्या १४९.१ लाख टनांच्या तुलनेत यंदा १३१.८ लाख टन आयात झाली आहे. खाद्यतेलाचा सर्वाधिक वापर होणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट, लग्न, समारंभ एप्रिलपासून लॉकडाउनमुळे बंद असल्याने मागणी कमी झाली, तर सणांमुळे घरगुती वापर वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची मागणी वाढली. परिणामी या तेलांची आयात वाढली आहे.
सॉल्व्हेंट एस्ट्राक्टर असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे, की देशातील लॉकडाउनमुळे वनस्पती तेलाचा वापर कमी झाला आहे. याचा परिणाम तेल आयातीवर झाला. २०१८-१९ या तेल वर्षात वनस्पती तेलाची आयात १५५.५ लाख टन झाली होती. मात्र यंदा देशात एप्रिल महिन्यापासून लॉकडाउन झाल्याने सर्वच क्षेत्रे ठप्प झाली होती.
खाद्यतेल आयातीत रिफाइंड, ब्लिच्ड आणि गंधमुक्त पामतेल (आरबीडी) आणि कच्च्या पामतेलाचा वाटा मागील वर्षी एकूण आयातीच्या तब्बल ६३ टक्के होता, यंदा यात घड होऊन ४८ टक्के झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिफाइंड तेलाची आयात कमी झाली आहे. त्याचा फायदा देशातील तेल रिफायनरींना झाला आहे.
प्रकारानिहाय खाद्यतेल आयात (लाख टनांत)
प्रकार | २०१९-२० | २०१८-१९ |
आरबीडी पामतेल | ४.२१ | २७.३१ |
कच्चे पामतेल | ६६.६६ | ६५.३४ |
सीपीकेओ | १.३० | १.४४ |
सोयाबीन तेल | ३३.८४ | ३०.९४ |
सूर्यफूल तेल | २५.१९ | २३.५१ |
मोहरी तेल | ०.५५ | ०.५९ |
सहा वर्षांतील नीचांकी आयात
देशात यंदा खाद्यतेलाची गेल्या सहा वर्षांतील नीचांकी आयात झाली आहे. गेल्या सहा वर्षांत २०१६-१७ मध्ये सर्वाधिक १५०.७७ लाख टन खाद्यतेल आयात झाली होती. तर यंदा सर्वांत कमी १३१.७५ लाख टन आयात झाली आहे.
वर्षनिहाय खाद्यतेल आयात (लाख टनांत)
२०१९-२०: १३१.८
२०१८-१९: १४९.१
२०१७-१८: १४५.१
२०१६-१७: १५०.८
२०१५-१६: १४५.७
२०१४-१५: १४४.२
एकूण आयातीतील रिफाइंड तेलाचा वाटा (टक्क्यांत)
२०१९-२०: ३
२०१८-१९: १८
२०१७-१८: १५
२०१६-१७: १९
२०१५-१६: १८
खाद्यतेल आयातीचा परिणाम
- २०१९-२० च्या मध्यानंतर मागणी घटल्याने आयातीवर परिणाम
- गेल्या वर्षी केंद्र सरकारने ‘आरबीडी’ पामतेल आयातीवरील शुल्क ५ टक्क्यांनी वाढविले, त्यानंतर ८ जानेवरी २०२० रोजी या तेलाच्या आयातीवर बंधने घातली. परिणामी, ‘आरबीडी’ पामतेलाची आयात यंदा ४.२१ लाख टनांवर आली आहे. जी गेल्या वर्षी २७.३० लाख टन होती.
- घरगुती वापर वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही तेलांची आयात वाढली.
- ‘आरबीडी’ पामोलीनची निर्यात कमी झाल्याने देशांतर्गत रिफानरींची क्षमता वापर वाढला आहे. गेल्या वर्षी देशातील रिफायनरी केवळ ४० ते ४५ टक्के क्षमतेने सुरू होत्या. यंदा त्या ५५ ते ६० टक्के क्षमतेचा वापर करत आहेत.
प्रतिक्रिया
देशात लॉकडाउनमुळे हॉटेल्स, रेस्टॅरंट्स, लग्न आणि समारंभ बंद असल्याने खाद्यतेलाची मागणी घटली होती. त्यामुळे आयातीतही घट झाली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात मात्र वाढली आहे.
- बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, ‘एसईए’
- 1 of 674
- ››