agriculture news in Marathi edible oil import down by 12 percent Maharashtra | Agrowon

खाद्यतेल आयातीत १२ टक्के घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

खाद्यतेल आयात ११.६० टक्क्यांनी घटली असून, गेल्या वर्षीच्या १४९.१ लाख टनांच्या तुलनेत यंदा १३१.८ लाख टन आयात झाली आहे.

पुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये वनस्पती तेलाची आयात १३ टक्क्यांनी कमी होऊन १३५.३ लाख टन झाली आहे. गेल्या वर्षी १५५.५ लाख टन आयात झाली होती. तर खाद्यतेल आयात ११.६० टक्क्यांनी घटली असून, गेल्या वर्षीच्या १४९.१ लाख टनांच्या तुलनेत यंदा १३१.८ लाख टन आयात झाली आहे. खाद्यतेलाचा सर्वाधिक वापर होणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट, लग्न, समारंभ एप्रिलपासून लॉकडाउनमुळे बंद असल्याने मागणी कमी झाली, तर सणांमुळे घरगुती वापर वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची मागणी वाढली. परिणामी या तेलांची आयात वाढली आहे. 

सॉल्व्हेंट एस्ट्राक्टर असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे, की देशातील लॉकडाउनमुळे वनस्पती तेलाचा वापर कमी झाला आहे. याचा परिणाम तेल आयातीवर झाला. २०१८-१९ या तेल वर्षात वनस्पती तेलाची आयात १५५.५ लाख टन झाली होती. मात्र यंदा देशात एप्रिल महिन्यापासून लॉकडाउन झाल्याने सर्वच क्षेत्रे ठप्प झाली होती. 
खाद्यतेल आयातीत रिफाइंड, ब्लिच्ड आणि गंधमुक्त पामतेल (आरबीडी) आणि कच्च्या पामतेलाचा वाटा मागील वर्षी एकूण आयातीच्या तब्बल ६३ टक्के होता, यंदा यात घड होऊन ४८ टक्के झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिफाइंड तेलाची आयात कमी झाली आहे. त्याचा फायदा देशातील तेल रिफायनरींना झाला आहे. 

प्रकारानिहाय खाद्यतेल आयात (लाख टनांत)

प्रकार २०१९-२० २०१८-१९
आरबीडी पामतेल ४.२१ २७.३१
कच्चे पामतेल ६६.६६ ६५.३४
सीपीकेओ १.३० १.४४
सोयाबीन तेल ३३.८४ ३०.९४
सूर्यफूल तेल २५.१९ २३.५१
मोहरी तेल ०.५५ ०.५९

सहा वर्षांतील नीचांकी आयात
देशात यंदा खाद्यतेलाची गेल्या सहा वर्षांतील नीचांकी आयात झाली आहे. गेल्या सहा वर्षांत २०१६-१७ मध्ये सर्वाधिक १५०.७७ लाख टन खाद्यतेल आयात झाली होती. तर यंदा सर्वांत कमी १३१.७५ लाख टन आयात झाली आहे. 

वर्षनिहाय खाद्यतेल आयात (लाख टनांत)
२०१९-२०: १३१.८
२०१८-१९: १४९.१
२०१७-१८: १४५.१
२०१६-१७: १५०.८
२०१५-१६: १४५.७
२०१४-१५: १४४.२

एकूण आयातीतील रिफाइंड तेलाचा वाटा (टक्क्यांत)
२०१९-२०:

२०१८-१९: १८
२०१७-१८: १५
२०१६-१७: १९
२०१५-१६: १८

खाद्यतेल आयातीचा परिणाम

  • २०१९-२० च्या मध्यानंतर मागणी घटल्याने आयातीवर परिणाम
  • गेल्या वर्षी केंद्र सरकारने ‘आरबीडी’ पामतेल आयातीवरील शुल्क ५ टक्क्यांनी वाढविले, त्यानंतर ८ जानेवरी २०२० रोजी या तेलाच्या आयातीवर बंधने घातली. परिणामी, ‘आरबीडी’ पामतेलाची आयात यंदा ४.२१ लाख टनांवर आली आहे. जी गेल्या वर्षी २७.३० लाख टन होती.
  • घरगुती वापर वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही तेलांची आयात वाढली. 
  • ‘आरबीडी’ पामोलीनची निर्यात कमी झाल्याने देशांतर्गत रिफानरींची क्षमता वापर वाढला आहे. गेल्या वर्षी देशातील रिफायनरी केवळ ४० ते ४५ टक्के क्षमतेने सुरू होत्या. यंदा त्या ५५ ते ६० टक्के क्षमतेचा वापर करत आहेत. 

प्रतिक्रिया
देशात लॉकडाउनमुळे हॉटेल्स, रेस्टॅरंट्स, लग्न आणि समारंभ बंद असल्याने खाद्यतेलाची मागणी घटली होती. त्यामुळे आयातीतही घट झाली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात मात्र वाढली आहे.
- बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, ‘एसईए’


इतर अॅग्रोमनी
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...