Agriculture News in Marathi Edible oil import duty The deductions benefit the customers a little | Page 2 ||| Agrowon

खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना अल्प लाभ 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे.

पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे. तसेच उद्योगातील घटकांना खाद्यतेल आणि तेलबिया साठ्याची माहिती देण्यास सांगितले आहे. मात्र या निर्णयाचा ग्राहकांना फार मोठा लाभ होताना दिसत नाही. सरकारच्या अपेक्षेपेक्षा कमीच लाभ ग्राहकांना होताना दिसत आहे. 

देशाला आवश्यक असलेल्या एकूण खाद्यतेलापैकी तब्बल ६५ ते ७० टक्के तेल आयात करावे लागते. त्यामुळे आपोआप आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशांतर्गत दरावर थेट परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर हे वरच्या पातळीवर कायम आहेत. त्यामुळे देशातही ग्राहकांना खाद्यतेलासाठी जास्त पैसा मोजावा लागत आहे. सरकारने आयात शुल्क कमी केले असले तरी वाढत्या दरामुळे त्याचा थेट फायदा ग्राहकांना होताना दिसत नाही. 

जुलै महिन्यात खाद्यतेल आयात कमी झाली होती. परंतु देशांतर्गत स्रोतांपासून तेलनिर्मितीही वाढली नव्हती, त्यामुळे ऑगस्ट महिन्यात खाद्य तेल बाजार वरच्या पातळीवर होते. ऑगस्ट महिन्यात आयात वाढली परंतु देशांतर्गत निर्मिती कमजोर राहिली, त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही दरात विशेष फरक पडला नाही. 

आठ खाद्यतेलांच्या किमतीत घसरण : केंद्राचा दावा 
सरकारने खाद्यतेलांची साठेबाजी कमी करण्यासाठी आणि पुरवठा वाढविण्यासाठी विविध साठ्यांची माहिती मागविणे, आयात शुल्कात कपात करणे आदी उपाय केल्याने आठ प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मागील आठवड्यात १४ सप्टेंबरपर्यंत शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, पाम, नारळ, तीळ आणि वनस्पती तेलाच्या घाऊक किमतीत कपात झाल्याचे सरकारने म्हटले आहे. खाद्य तेलांचे दर कमी होत असले तरी अद्यापही मागील वर्षीच्या तुलनेत अधिकच आहेत. 

ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पामतेलाच्या घाऊक किमतीत १४ सप्टेंबरपर्यंत प्रतिटन १२ हजार ६६६ रुपयांवरून २.५० टक्के घसरण होऊन १२ हजार ३४९ रुपये प्रति टनांवर आले आहेत. तर तीळ तेलाची किंमत २.०८ टक्यांनी कमी होऊन प्रतिटन २३ हजार ५०० रुपये, नारळ तेलाची किंमत १.७२ टक्क्यांनी कमी होऊन १७ हजार १०० रुपये प्रती टन झाली आहे.

तसेच सूर्यफुलाचे दर १.३० टक्क्यांनी कमी होऊन १५ हजार ९६५ रुपयांवर आले आहेत. तर शेंगदाणा तेलाचे दर १.३८ टक्क्यांनी कमी होऊन १६ हजार ८३९ रुपये, आणि मोहरीचे तेल १ टक्क्याने कमी होऊन १५ हजार ५७३ रुपये तर वनस्पती तेलाचे दर १२ हजार ५०८ रुपये प्रति टन झाले आहेत. 


इतर अॅग्रोमनी
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....