खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढ

शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहे.
Edible oil prices rise by 80 per cent over last year
Edible oil prices rise by 80 per cent over last year

नागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहे. नवीन पीक येण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी असल्याने पुढील चार महिने भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाम तेलाचे भाव इतर तेलांच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे पाम तेलाचे भाव वाढले. गेल्या वर्षी खाद्य तेलाचे भाव ९५ ते १०० रुपये प्रति किलो असलेले सोयाबीन तेल सध्या १७५ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय गेल्या वर्षी शेंगदाना तेल १२० रुपये प्रति किलो मिळत होते ते आता १९० ते १९५ वर जाऊन धडकले. १३० रुपये प्रति किलो असलेले सूर्यफूल तेल १८० ते १८५ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे.

खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)
तेल मे २०२१ मे २०२०
सोयाबीन १७५  १००
सूर्यफूल  १८५  ११०
शेंगदाणा  १९५  १३३

कोरोनामुळे वाढलेला आरोग्यावरील खर्च, इंधनाचे वाढते दर, आवाक्याबाहेर जाणारे गॅस सिलिंडरचे दर यामुळे जगावे कसे असा प्रश्‍न निर्माण होत आहे. गेल्या वर्षीपासून एक तर कोरोनामुळे व्यवहार ठप्प राहण्यासह सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे. - शिवानी मुक्कावार, गृहिणी

विदेशातून ७० टक्के खाद्य तेलाची आयात होते. यंदा अमेरिकेमध्ये आणि मलेशियात पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या भावात सतत वाढ होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने आवकेवर परिणाम होऊन तेलाचे भाव वाढत आहेत. - प्रभाकर देशमुख, व्यापारी

महागाईने चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाचे भाव सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काटकसरीवर भर दिला आहे. - संगीता गावंडे, गृहिणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com