Agriculture news in Marathi Edible oil prices rise by 80 per cent over last year | Agrowon

खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 मे 2021

शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहे.

नागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहे. नवीन पीक येण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी असल्याने पुढील चार महिने भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाम तेलाचे भाव इतर तेलांच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे पाम तेलाचे भाव वाढले. गेल्या वर्षी खाद्य तेलाचे भाव ९५ ते १०० रुपये प्रति किलो असलेले सोयाबीन तेल सध्या १७५ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय गेल्या वर्षी शेंगदाना तेल १२० रुपये प्रति किलो मिळत होते ते आता १९० ते १९५ वर जाऊन धडकले. १३० रुपये प्रति किलो असलेले सूर्यफूल तेल १८० ते १८५ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे.

खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)
तेल मे २०२१ मे २०२०
सोयाबीन १७५  १००
सूर्यफूल  १८५  ११०
शेंगदाणा  १९५  १३३

कोरोनामुळे वाढलेला आरोग्यावरील खर्च, इंधनाचे वाढते दर, आवाक्याबाहेर जाणारे गॅस सिलिंडरचे दर यामुळे जगावे कसे असा प्रश्‍न निर्माण होत आहे. गेल्या वर्षीपासून एक तर कोरोनामुळे व्यवहार ठप्प राहण्यासह सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
- शिवानी मुक्कावार, गृहिणी

विदेशातून ७० टक्के खाद्य तेलाची आयात होते. यंदा अमेरिकेमध्ये आणि मलेशियात पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या भावात सतत वाढ होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने आवकेवर परिणाम होऊन तेलाचे भाव वाढत आहेत.
- प्रभाकर देशमुख, व्यापारी

महागाईने चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाचे भाव सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काटकसरीवर भर दिला आहे.
- संगीता गावंडे, गृहिणी

 


इतर ताज्या घडामोडी
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...
सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ...
आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे...नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध...
‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्गनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्तसांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी...