शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल : शास्त्रज्ञ अनिल काकोडकर

शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल : शास्त्रज्ञ अनिल काकोडकर
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल : शास्त्रज्ञ अनिल काकोडकर

वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता वाढवणे, निर्यातीला प्राधान्य देणे, शिक्षण आणि विज्ञानातील अपेक्षित प्रगती साधणे, याकडे लक्ष द्यावे लागेल. संपत्ती निर्माण आणि सामाजिक मूल्यांचा आग्रह, अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला लढाई करावी लागेल.'' असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. 

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शहीद भगतसिंग यांचे पुतणे ॲड. किरणजित सिंग, कुसुम नायकवडी, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नंदिनी नायकवडी, किरण नायकवडी, डॉ. सुषमा नायकवडी, गौरव नायकवडी, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. 

डॉ. काकोडकर म्हणाले, "क्रांतिवीर नायकवडी व शहीद भगतसिंग अशा थोर स्वातंत्र्यवीरांनी मोठी स्वप्ने पाहिली. ती तडीस नेण्यासाठी आयुष्य पणाला लावले. आर्थिक क्रांती हवीच, मात्र त्यामुळे सारे प्रश्‍न सुटतील असे नाही. सध्या विषमता वाढीचा धोका देशासमोर आहे. त्यातून नवे संघर्ष निर्माण होतील. अशा वेळी समाजाच्या गरजांचा विचार करून विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात किमान गरजेएवढे काम होणे अपेक्षित आहे.

'' ॲड. किरणजित सिंग म्हणाले, "सशक्त समाजनिर्मितीसाठी मोठे काम उभे केले. शोषणविरहित, भेदमुक्त असा समाज निर्माण झाला पाहिजे, हे हुतात्म्यांचे उद्दिष्ट होते. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासणे आपणासमोर आव्हान आहे. ते पेलण्याची क्षमता प्रत्येकाने निर्माण केली पाहिजे. गरिबीमुक्त समाज, जातिधर्मावर आधारित असलेली समाजव्यवस्था मोडून काढणे, प्रादेशिक भाषावाद ही बंधने तोडणाऱ्या समाजाची निर्मिती गरजेची आहे.''

निमंत्रक वैभव नायकवडी म्हणाले, "क्रांतिवीरांचा स्मृतिदिन साजरा करताना व्यवस्थेसमोर मोठी आव्हाने आहेत. प्रत्येक माणूस त्यांच्या विचाराने प्रेरित व्हावा, पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात व्यवस्थेविरोधात त्यांनी केलेला संघर्ष समोर यावा हा आमचा उद्देश राहिला आहे.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com