राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार : मुख्यमंत्री ठाकरे

सोलापूर : ‘‘जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाल्याबद्दल अभिमान आहे’’, गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
Education in the state will be of the highest standard: Chief Minister Thackeray
Education in the state will be of the highest standard: Chief Minister Thackeray

सोलापूर : ‘‘जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाल्याबद्दल अभिमान आहे’’, गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. डिसले यांच्यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा मुंबईत मंत्रालयात ठाकरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले,  ‘‘डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून, त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षण क्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते.’’ 

‘‘कोवीडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून वर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती. याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिसले यांच्यासारखे तंत्रज्ञानस्नेही आणि नावीन्यपूर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे,’’ असेही ठाकरे यांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्री पवार, बांधकाममंत्री शिंदे, शिक्षणमंत्री गायकवाड यांचीही भाषणे झाली. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची भावना डिसले यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com