अमेरिकन फॉल आर्मी वर्म अळीचा मका, उसावर प्रादुर्भाव

उसाच्या क्षेत्रावर अमेरिकन फॉल आर्मी वर्म किडीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी दोन कामगंध सापळे प्रादुर्भावाची तीव्रता जाणून घ्यावी. नुकसानीच्या पातळीच्या पुढे असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शिफारशीत किटकनाशकाची फवारणी घ्यावी. - डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ, केव्हीके, औरंगाबाद.
लष्करी अळी
लष्करी अळी

औरंगाबाद: जिल्ह्यातील आपेगाव, आगर, नांदूर, नवगाव येथे अमेरिकन फॉल आर्मी वर्म किडीचा मका व ऊस पिकावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. लाखेगाव येथील मका पिकावर प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. किशोर झाडे व पैठणचे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भूते व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गावांमध्ये शुक्रवारी (ता. ५)प्रत्यक्ष जावून प्रादुर्भावाची पाहणी केली.  पैठण तालुक्‍यातील लाखेगाव तालुका पैठण येथील शेतकऱ्यांच्या शेतावर चारा पीक म्हणून घेण्यात आलेले मका या पिकावर सध्या अमेरिकन फॉल आर्मी वर्म या लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला. त्यामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्‍यता आहे. ही कीड आपल्या भागात नवीन आहे, तसेच या पिढीला पर्यायी खाद्य पीक आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. मका, ऊस, बाजरी, ज्वारी अशा साधारणता तीनही हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांवरती ही कीड उपजीविका करते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा संबंधित उपाययोजना जसे की कामगंध सापळ्यांचा वापर, किडीचा प्रादुर्भाव ओळखून योग्य शिफारशीत कीडनाशकांच्या वापरातून नियंत्रण करणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञ डॉ. किशोर झाडे म्हणाले.  प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील खासकरून मका व तृणधान्यवर्गीय पिकावर या अळीचे मोठे आक्रमण होण्याचा धोका आहे. जवळपास ८० पिकांवर ही अळी उपजीविका करत असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत उसाची पाने खाललेली दिसत असल्यास खालच्या बाजूस अळ्या जमिनीवर दिसत असल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीत समोर आले आहे. या अळीवर त्वरित नियंत्रण न मिळविल्यास ती अन्य पिकांनाही आपले लक्ष करू शकते. देशातील तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगाना आंध्र प्रदेश आदी राज्यातील मका फस्त करणाऱ्या या अळीने महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांतील जवळपास दहा हजार हेक्‍टरवरील मका पीकही फस्त केल्याची माहिती याविषयी औरंगाबादेत पार पडलेल्या कार्यशाळेत देण्यात आली होती.  तज्ज्ञ म्हणतात या उपाययोजनांचा करा अवलंब

  • शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत
  • एक गावात मका पिकाची लागवड शेतकऱ्यांनी एकाच वेळी करावी, त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
  • कडधान्य आणि तृणधान्य पिकांची फेरपालट करणे अत्यावश्‍यक 
  • लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळलेल्या शेतात तत्काळ खोल नांगरट करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com