agriculture news in marathi Effect of cloudy weather on rabbi in Nanded district | Page 2 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा रब्बीवर परिणाम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा सुरवातीपासूनच थंडी कमी - अधिक होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या भागात तसेच जमिनीतील ओलाव्यावर पिके घेतली जातात. रब्बीच्या काळात नैसर्गिक आपत्तीची शक्यता खरिपाच्या तुलनेत कमी असते. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील उत्पादनाची खात्री असते. परंतु, यंदा म्हणावी तशी थंडी पडली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. यानंतर मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमानाचा पारा २१ अंश सेल्सिअसपर्यंत वर गेला. 

जिल्हा तेलंगणा सीमेलगत आहे. त्यामुळे दक्षीण भारतात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याला जाणवतो. अशावेळी राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये पावसाचे सावट असते. सोमवारी (ता. ३०) जिल्ह्याचे कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आगामी काही दिवसही ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे हरभरा, गहू, करडी, रब्बी ज्वारी या पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे जाणवत 
आहे.

एक लाख हेक्टरवर पेरणी 

जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक हरभरा आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३६ हजार हेक्टर आहे. यात मागील काही काळात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातील पाणी पाळ्या मिळत आहेत. त्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. 

तीन लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यात सार्वधिक एक लाख ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. तर, ४० हजार हेक्टरवर गहू व ३४ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. यंदा यात कृषी विभागाकडून वाढ व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.


इतर ताज्या घडामोडी
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात...परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी...
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाजळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची...
‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई...परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी)...
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत...पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता....
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत...परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी...देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे...
पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदानपुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी...
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार...पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर...
आसामच्या चहाचे चाहते!भर्रर्रऽऽ असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेटच्या...
शाश्‍वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धतीग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-...