Agriculture news in Marathi The effect of the rain diminished | Agrowon

राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

 राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या दोन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप राहणार आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

पुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या दोन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप राहणार आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

बंगालचा उपसागराच्या परिसरात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती उत्तरेकडे पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची तिव्रता अधिक नसल्याने दोन दिवसात ते विरून जाण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही काही प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होऊन कडाक्याचे ऊन पडेल. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा काहीसा वाढणार असून उन्हाचा चटका वाढेल.  

राज्यात कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. खानदेशातील धुळे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर  जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. इतर भागात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी शिडकावा होईल. शुक्रवारी (ता. २३) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर शनिवारपासून राज्यातील सर्वच भागात पावसाची उघडीपीसह काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

परतीच्या मॉन्सूनची झारखंड,
बिहार, सिक्कीममधून माघार

पंधरा दिवसांपूर्वी गुजरात, मध्य प्रदेश व अरबी समुद्र या भागातून परतीच्या मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर काही दिवस रेंगाळला होता. मात्र, बुधवारी उत्तर प्रदेशातील बहुतांशी भाग, बिहारचा काही भाग, पश्चिम बंगालचा उत्तरेकडील भाग, सिक्कीम, झारखंड, उत्तर छत्तीसगड, मध्य प्रदेशातील संपूर्ण भागातून माघार घेतली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत आणखी माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे झारखंड, गुजरात, ओडिसाचा काही भाग व उत्तर महाराष्ट्रातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात बाष्प कमी होत असून कोरडे वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...