पूर्वमोसमीचा प्रभाव उद्यापासून कमी होण्याची शक्यता 

उद्यापासून (ता. गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे.
The effects of the pre-monsoon are likely to subside from tomorrow
The effects of the pre-monsoon are likely to subside from tomorrow

पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागात पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. उद्यापासून (ता. गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. आज (बुधवारी) राज्यातील सर्वच भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हिमालय, पश्‍चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच दक्षिण तमिळनाडूच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम आहे. तर ओडिशाच्या परिसरात काही प्रमाणात चक्रिय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार आहे. तर मराठवाडा व विदर्भात शनिवारपर्यंत पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

सध्या राज्यात ढगाळ वातावरण, अंशत दिवसभर ऊन, तर दुपारनंतर वादळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा तयार झाला असून, कमाल व किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट होऊन कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान, तर महाबळेश्‍वर येथे १८.१ सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

येथे पावसाची शक्यता  बुधवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ  गुरुवार ः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ,  शुक्रवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com