अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा...

पाणी आणि अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचा वापर फायदेशीर ठरतो. फळबाग, भाजीपाला, ऊस पिकासाठी या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा झाला आहे.
The use of balanced nutrients is important for quality production
The use of balanced nutrients is important for quality production

पाणी आणि अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचा वापर फायदेशीर ठरतो. फळबाग, भाजीपाला, ऊस पिकासाठी या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा झाला आहे. फर्टिगेशनद्वारे पीक आणि मातीच्या प्रकारानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते. पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांच्या सतत पुरवठा होतो. जमिनीची घटत जाणारी सुपीकता ही पीक उत्पादनावर परिणाम करते. पिकांनी जमिनीतून अन्नद्रव्यांची केलेली उचल आणि अन्नद्रव्यांचा वापर यामध्ये मोठी तफावत आहे. अन्नद्रव्यांचा अयोग्य प्रमाणात केलेल्या वापरामुळे पीक उत्पादकता कमी होत आहे. फर्टिगेशनच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता

अन्नद्रव्यांची कार्यक्षमता %
अन्नद्रव्य जमिनीतून ठिबक ठिबकद्वारे फर्टिगेशन
नत्र ३०-५० ६५ ९५
स्फुरद २० ३० ४५
पालाश ५० ६० ८०

फर्टिगेशनचे फायदे 

  • पाणी आणि अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी विद्राव्य खतांचा फर्टिगेशनच्या माध्यमातून वापर केल्याने उत्पादनात वाढ.
  • उच्च दर्जाच्या शेतमालाचे उत्पादन मिळते.
  • वेळ आणि मजुरीत बचत.
  • अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ.
  • पाणी आणि अन्नद्रव्यांवरील खर्चात बचत.
  • विद्राव्य खत निवड करताना 

  • संपूर्ण विद्राव्यता असावी. निर्देशित अन्नद्रव्यांची उपलब्धता होणे गरजेचे.
  • हानिकारक घटक, क्षारांचे प्रमाण आणि सामू तपासावा.
  • पिकाचा प्रकार आणि वाढीची अवस्था तसेच मातीचा प्रकार व संरचना लक्षात घ्यावी.
  • पाण्याची गुणवत्ता तपासावी.
  • अन्नद्रव्यांचे महत्त्व नत्र 

  • पीक वाढीतील महत्त्वाचा घटक, पिकास गडद हिरवा रंग मिळवून देण्यास अत्यंत उपयोगी.
  • पाने, फांद्या,कायिक वाढीसाठी आवश्यक.
  • पोटॅशिअम आणि स्फुरदाची उपलब्धता करून देण्यास मदत.
  • स्फुरद

  • मुळांची जडणघडण, वाढीसाठी महत्त्वाचा घटक.
  • फुलांची संख्या, फळ धारणेसाठी आवश्यक, पेशींच्या जडण घडणीमध्ये आवश्यक.
  • ऊर्जा परिवर्तन, चयापचय आणि श्वसन प्रक्रियेमध्ये समावेश.
  • पोटॅश

  • जोमाने वाढ होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • श्वासोच्छ्वास आणि पर्ण बाष्पीभवनाद्वारे वनस्पतींच्या शरीरातील पाण्याचे नियमन.
  • पिष्टमय पदार्थ आणि शर्करा तयार करण्यासाठी आवश्यक.
  • पोटॅशिअममुळे संप्रेरकांच्या क्रियेमध्ये वाढ, फळांचा आकार वाढून, चव आणि साठवण क्षमता वाढवते.
  • कॅल्शिअम

  • पेशीभित्तिकेचा महत्त्वाचा घटक, पेशीविभाजनासाठी आवश्यक.
  • मुळांची जडणघडण व वाढीसाठी महत्त्वाचा घटक.
  • मुळांच्या टोकांची वाढ, फळ धारणेसाठी अत्यंत आवश्यक.
  • मॅग्नेशिअ

  • प्रकाश संश्लेषण, हरितद्रव्य निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक.
  • स्फुरद वहनामध्ये अत्यंत आवश्यक.
  • इतर मूलद्रव्यांच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक.
  • हरितद्रव्य निर्मितीस मदत, कायिक वाढीसाठी आवश्यक.
  • गंधक

  • मुळे तयार करणे, त्यांची वाढ करण्यास मदत.
  • फळ धारणेमध्ये महत्त्वाचा सहभाग.
  • साठवण कालावधी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आवश्यक.
  • अमायनो अ‍ॅसिड व प्रथिने तयार करण्यास मदत, मिथीओनाईन, थायमीन आणि बायोटीनचा महत्त्वाचा घटक.
  • फेरस (लोह)

  • हरितद्रव्य निर्मितीसाठी आवश्यक. प्रकाश संश्लेषणात महत्त्वाचा घटक.
  • अन्नद्रव्यांचे वहन व शोषणासाठी मदत.
  • मँगेनीज फेरस सोबत राहून कार्य. जमिनीत हवा खेळती ठेवण्यास मदत. झिंक (जस्त) वनस्पतींच्या शरीरातील पाण्याचे नियमन, पीक पोषण संजीवक निर्मिती. कॉपर 

  • पीक वाढीच्या आवश्यक प्रक्रियेत कार्यरत, प्रेरकांना कार्यशील.
  • वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन, अ जीवनसत्त्व निर्मिती.
  • मॉलिब्डेनम

  • हवेतील नत्र जमिनीत स्थिर करणाऱ्या जिवाणूच्या वाढीसाठी फायदेशीर.
  • फॉस्फेट तयार करण्यास,क जीवनसत्त्व निर्मिती.
  • बोरॉन 

  • फुलधारणा, फळ धारणेमध्ये महत्त्वाचे कार्य.
  • कॅल्शिअम उपलब्धता व वहन करण्यास उपयोगी.
  • पेशी विभाजन व निर्मिती संजीवके व संप्रेरके वहन.
  • वनस्पतीत शर्करेचे वहन, पेक्टीन निर्मितीसाठी महत्त्वाचा.
  • संपर्क- संजय बिरादार, ८८८८८८२५९१ (वरिष्ठ पीक तज्ज्ञ, इस्त्रायल केमिकल्स लिमिटेड,पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com