Agriculture news in marathi Efforts are underway to stop the flow of water in the Babhali | Agrowon

‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाचे दरवाजे २९ आक्टोबरपर्यंत उघडेच ठेवावे लागतात.

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाचे दरवाजे २९ आक्टोबरपर्यंत उघडेच ठेवावे लागतात. मात्र, यंदा दमदार पाऊस झाल्यामुळे तसेच तेलंगणातील पोचमपाड प्रकल्पही शंभर टक्के भरल्यामुळे या प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या प्रधान सचिवांमध्ये पत्रव्यवहार आणि चर्चाही झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर बाभळी बंधारा आहे. या प्रकल्पात २.७४ टीएमसी (५६ दलघमी) पाणीसाठा होऊ शकतो. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीसाठा होऊ शकला नाही. यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील गोदावरी आणि तिच्या उपनद्यावर असलेले जायकवाडीपासून ते नांदेड जिल्ह्यातील बळेगाव बंधाऱ्यापर्यंत सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

बाभळी बंधाऱ्यात पाणी अडविण्याबाबत नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्यासह राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत पत्रव्यवहार व चर्चा केली. 
नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करून तसेच तेलंगणातील संबंधित विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार कार्यवाही देखील झाली. राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आणि तेलंगणातील प्रधान सचिव यांच्यात पत्रव्यवहार आणि चर्चाही झाली आणि ती सकारात्मक झाली आहे. त्यामुळे आता याबाबतच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. 

तेलंगणातील पोचमपाड धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पाणी वाया जाऊ नये, यासाठी बाभळी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी परवानगी मागण्यात आली आली आहे. यंदाच्या वर्षी पोचमपाड धरणात आत्तापर्यंत पाच हजार ३११ दलघमी तर पोचमपाड धरणातूनही तीन हजार ६१६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली.
- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, नांदेड.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...