agriculture news in marathi efforts of fellow villages honored me with Padma Award say Popatrao pawar | Agrowon

गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ : पोपटराव पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

गावकऱ्यांच्या श्रमातून पद्मश्री मिळाला अशी भावना पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 

नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर भर दिला. त्यामुळेच हिवरेबाजारकरांचे स्वप्न साकार होऊ शकले. गाव आदर्श करता आले. गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच दिल्लीत सन्मान स्वीकारताना मला माझ्या दगडधोंडे उचलणाऱ्या गावकऱ्यांची आठवण झाली. हीच ऊर्जा घेऊन मी काम करत आहे. गावकऱ्यांच्या श्रमातून पद्मश्री मिळाला अशी भावना पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'पद्मश्री' स्वीकारल्यानंतर बुधवारी (ता.१०) पोपटराव पवार यांचा आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये मिरवणूक काढून देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत गावकऱ्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून गावातील ७५ ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना पोपटराव भावनिक झाले. ते म्हणाले, ‘‘लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. क्रिकेटने मला सहनशीलता शिकवली. त्याचाच उपयोग हिवरे बाजारचा कायापालट करण्यात उपयोगी पडला. गावात काम करण्यासाठी सहनशीलता आणि टीम वर्कला मोठे महत्त्व असते. हेच कौशल्य क्रिकेटमधून मिळाले आहे. दुसरी एक गोष्ट कटाक्षाने पाळली, ती म्हणजे राजकारणापासून दूर राहिलो. निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांकडून ऑफर येत होत्या. पण राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर भर देण्याचे ठरविले. त्यामुळेच हिवरेबाजारकरांचे स्वप्न साकार होऊ शकले.’’ 

‘‘गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच दिल्लीत सन्मान स्वीकारताना मला माझ्या दगडधोंडे उचलणाऱ्या गावकऱ्यांची आठवण झाली. हीच ऊर्जा घेऊन मी काम करत आहे. कोणतेही काम एकीशिवाय शक्य नाही. यापुढेही राज्याच्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार आहे,’’ असे श्री. पवार म्हणाले. 

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार नीलेश लंके, माजी आमदार साहेबराव दरेकर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, दत्ता काकडे, अशोकराव खरात, प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, सरपंच विमल ठाणगे उपस्थित होते. 

राज्यात पाचशे गावे आदर्श करणार 
पोपटराव पवार म्हणाले, की आम्ही नेहमीच हिवरेबाजारसारखी गावे राज्यात आदर्श व्हावीत यासाठी प्रयत्न केले आहेत. येत्या काही वर्षांत राज्यातील पाचशे गावे हिवरेबाजार, राळेगणसिद्धीप्रमाणे आदर्श होणार आहेत. पाण्याचा ताळेबंद केल्यानेच हिवरेबाजारने दुष्काळावर मात केली. आता गावाच्या मालकीची शेततळी करून समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचे धोरण स्वीकारावे लागणार आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...