Agriculture news in Marathi Efforts to increase the durability of hurdles | Agrowon

हुरड्याची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी गुजरात राज्यातील वाडीलाल इंडस्ट्रीजला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी हुरडा फ्रोझन करून त्याच आयुष्य वाढवण्याबाबत तसेच हुरडा विक्रीच्या कराराबाबत प्राथमिक चर्चा केली. 

औरंगाबाद : ‘आत्मा’च्या माध्यमातून हुरड्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी गुजरात राज्यातील वाडीलाल इंडस्ट्रीजला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी हुरडा फ्रोझन करून त्याच आयुष्य वाढवण्याबाबत तसेच हुरडा विक्रीच्या कराराबाबत प्राथमिक चर्चा केली. 

मोटे म्हणाले, की गुजरात राज्यात हुरडा हा भाजून विक्री केला जातो. औरंगाबादमध्ये तो कच्चा बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध असल्याचा प्राथमिक फरक आहे. आपल्याकडील हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. प्रयत्नाला यश आले तर हुरड्याचा टिकवण कालावधी वाढविता येणे शक्य होईल. हुरडा हा दोन दिवसांत खराब होताना दिसतो. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढला, तर तो वर्षभर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी आपण वाडीलाल इंडस्ट्री सोबत शेतकऱ्यांचा ॲग्रीगेटर मार्फत करार करण्याचा प्रयत्न करत आहोत. वाडीलाल ग्रुप हा हुरडा किमान सहा महिने ते वर्षभर फ्रोझन करतो. परंतु त्यांना हुरडा भाजून द्यावा लागतो. ५० किलो हुरडा प्रायोगिक तत्त्वावर भाजून पाठविण्यात आला आहे. सृष्टी ॲग्रो टुरिझमच्या प्रतिभा सानप यांनी ॲग्रिगेटर म्हणून हुरडा भाजून सप्लाय करण्याची तयारी दाखवली आहे. वाडीलालचे अधिकारी लवकरच भेट देणार आहेत. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा डॉ. तुकाराम मोटे, प्रकल्प उपसंचालक अनिल साळुंखे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रयत्न सुरू आहेत. मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, कृषी सहायक गणेश यादव, आत्माचे चंद्रकात तायडे, भगवान लघाणे प्रयत्न करत असल्याचे मोटे म्हणाले. 

सारंगपूर, नरसापूर हुरड्यासाठी प्रसिद्ध
जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सारंगपूर व नरसापूर ही गावे हुरडा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. कमी पाण्यात हलक्या जमिनीत हमखास उत्पादन देणारा सुरती व गुळभेंडी हुरडा ही या भागाची ओळख आहे. या पंचक्रोशीत सुमारे ११०० एकरवर हुरड्याचे पीक घेतले जाते. गंगापूर तालुक्यातील या पट्ट्यात पिकणारा हुरडा हा राज्याच्या सर्व भागांत विक्रीसाठी पोहोच केला जातो. हुरड्याचा दर २५० ते ३५० रुपये प्रति किलो दर्जानुसार आहे. यातून कोटींची उलाढाल होताना दिसून येते.

वेगवेगळे प्रयोग करून दराबाबत हुरड्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी वाडीलाल इंडस्ट्रीसोबत हुरडा फ्रोझन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. 
- ज्ञानेश्‍वर तारगे, तालुका कृषी अधिकारी, गंगापूर


इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...