Agriculture news in marathi Efforts to increase farmers' income: Deputy Director of Agriculture Mane | Agrowon

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील : कृषी उपसंचालक माने

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 जुलै 2020

सोलापूर  : ‘‘देशातील विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्नातील वाढ, या त्रिसूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील आहे,’’ असे कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी सांगितले. 

सोलापूर  : ‘‘देशातील विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्नातील वाढ, या त्रिसूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील आहे,’’ असे कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी सांगितले. 

आत्मा सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात माने बोलत होते. कृषी संजीवनी सप्ताहाच्या प्रारंभाप्रसंगी विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकने, उपसंचालक राहूल सदाफुले, कृषी विकास अधिकारी कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदी उपस्थित होते. 

माने यांनी वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील कामाचे महत्व विषद केले. कृषी संजीवनी सप्ताहामध्ये कृषी तंत्रज्ञान परिणामकारक होण्यासाठी प्रचार व जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. लापुरातील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन केले. तर, अमृतसागर यांनी जिल्हा खरीप हंगामामध्ये समाविष्ट केल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरीप पिकाच्या शिफारशीबाबत मार्गदर्शन केले. 

कृषी विभागाच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण झाले. यावेळी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. मंजुनाथ पाटील, तंत्र अधिकारी माळी, कृषी अधिकारी नारायणकर, सचिन चव्हाण आदींसह शेतकरी, कृषी मित्र उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले. आभार दक्षिण तालुका कृषी अधिकारी वाघमोडे यांनी मानले. 
 


इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...