agriculture news in marathi Efforts to maximize compensation to farmers: Bharne | Agrowon

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी प्रयत्नशील ः भरणे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी नुकतीच अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री भरणे यांनी अक्कलकोट तालुक्यातील शिरसी आणि रामपूर गावातील नुकसानीची पाहणी केली. शिरसी येथे त्यांनी पावसाने वाहून गेलेल्या बांध आणि पडलेल्या घरांची पाहणी केली.   

भरणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व गावांत तत्काळ पंचनामे करा, अशा सूचना दिल्या आहेत. शेती, घरे, जनावरे यांच्या बाबतीतील पंचनामे संवेदनशीलरित्या करण्यासाठी महसूल, कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पंचनामे झाल्यावर राज्य शासनाकडून मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’

 महावितरणला अतिशय गतीने काम करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अंजली मरोड आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...