agriculture news in Marathi efforts to strong agri produce supply chain Maharashtra | Agrowon

शेतमाल विक्रीची साखळी व्यापक करण्यासाठी प्रयत्न: कृषिमंत्री भुसे 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

भविष्यात 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेतून शेतमाल विक्रीची साखळी तयार व्हावी, यातून शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल.

नाशिक: भविष्यात 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेतून शेतमाल विक्रीची साखळी तयार व्हावी, यातून शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल. अडचणीच्या काळात शहरातील ग्राहकांनाही योग्य दरात उपलब्ध होईल, या उद्देशाने ही संकल्पना व्यापक स्वरूपात करण्यासाठी कृषी विभाग पुढाकार घेणार आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शुक्रवार (ता.२४) आठ वाहनांमधून २० टन द्राक्षे व भाजीपाला थेट मुंबई व उपनगरांमधील ग्राहकांसाठी रवाना करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ, कैलास खैरनार, संजय सुर्यवंशी, आत्मा प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, दिंडोरीचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे उपस्थित होते. 

यावेळी कृषिमंत्री म्हणाले की, मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल थेट ग्राहकांच्या दारातपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम यापूर्वीही सुरू होता. लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठा अडचणीत आला. त्यामुळे अचानक दर पडले. अशा परिस्थितीत कृषि विभागाने शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. 

याबाबत कृषिमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी, सचिव कृषी, पणन विभागाचे अधिकारी यांच्या समन्वयातून द्राक्ष थेट ग्राहकांना विक्री करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार हा उपक्रम जिल्ह्यातून सुरू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

शेतकरी अडचणीत, त्याच्या पाठीमागे खंबीर उभे रहा 
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्वत:चा माल थेट विक्री करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या पाठीमागे खंबीर उभे रहा. शेतकऱ्याचा भाजीपाला, फळे विकत घ्या. ज्यांची परिस्थिती नसेल अशांना सेवाभाव वृत्तीतून खरेदी करून मोफत द्या,असे आवाहनही श्री.भुसे यांनी केले. 

उपक्रमात या शेतकरी कंपन्यांचा प्रत्यक्ष सहभाग 

  • श्री.श्री.सेंद्रीय फळे व भाजीपाला उत्पादक गट,उगाव,(ता.निफाड) 
  • श्री.कृष्णा भाऊसाहेब जाधव,सारोळे,(ता.निफाड) 
  • ओम गायत्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,निफाड 
  • श्री विघ्नहर्ता फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी.उगाव,(ता.निफाड) 
  • सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,मोहाडी,(ता.दिंडोरी) 
  • ग्रीन फिल्ड अग्रो सर्व्हिसेस,नाशिक 
  • दिंडोरी प्रणित फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,दिंडोरी 
  • वसुंधरा सेंद्रीय शेतमाल उत्पादक शेतकरी गट,वडगाव,(ता.सिन्नर) 
  • बळीराजा शेतकरी उत्पादक गट,जोगलटेंभी 
  • जनगंगा फाऊंडेशन,देवरगाव,(ता.चांदवड) 

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...