agriculture news in marathi, Eggplant 500 to 3000 rupees perquintal in the state | Agrowon

राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 मे 2019

साताऱ्यात १५०० ते २००० रुपये

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी (ता.१६) वांग्याची ४८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २००० रूपये असा दर मिळाला. काही अपवाद वगळता वांग्याचे दर १५०० ते २००० या दरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

साताऱ्यात १५०० ते २००० रुपये

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी (ता.१६) वांग्याची ४८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २००० रूपये असा दर मिळाला. काही अपवाद वगळता वांग्याचे दर १५०० ते २००० या दरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातून वांग्याची आवक होत आहे. रविवारी (ता. १२) वांग्याची ३७ क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला १००० ते २००० असा दर मिळाला. गुरूवारी (ता.२) वांग्याची २५ क्विंटल आवक झाली होऊन क्विंटलला ६०० ते १५०० असा दर मिळाला. हे अपवाद वगळता वांग्यास क्विंटलला १५०० ते २००० असा दर मिळाला आहे. वांग्याची ३० ते ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे किरकोळ विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

नाशिकात १२५० ते ३००० रुपये

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५) वांग्याची आवक २२१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २४५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. १४) वांग्याची आवक २७९ क्विंटल झाली. त्यास २००० ते ३२५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये होता. सोमवारी (ता. १३) वांग्याची आवक २२८ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८५० मिळाला. शनिवारी (ता. ११) वांग्याची आवक २२१ क्विंटल झाली. त्यांना ९०० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० होते.

शुक्रवारी (ता. १०) वांग्याची आवक २३४ क्विंटल, तर दर ८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. सर्वसाधारण दर २००० रुपये होते.
गुरुवारी (ता. ९ ) वांग्याची आवक १८२ क्विंटल झाली. त्यांना १००० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होते.
मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्याची आवक सर्वसाधारण होती. आवकेत चढ-उतार असून, त्यानुसार दरही सर्वसाधारण आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावत चढउ-तार दिसून आला.

जळगावात ६०० ते ११०० रुपये 
जळगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १६) वांग्याची ११ क्विंटल आवक झाली. त्यास दर प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये, असा मिळाला. आवक पाचोरा, एरंडोल, जामनेर, जळगाव, यावल या भागांतून होत आहे. दर स्थिर असून, महिनाभरात किमान दर ६०० रुपायांखाली गेलेले नाहीत. जिल्ह्यात हिरव्या, काटेरी व लहान आकाराच्या वांग्यांना मागणी आहे, अशी माहिती मिळाली. 

औरंगाबादेत ६०० ते २००० रुपये
औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १६) वांग्याची २५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ मे रोजी ५४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचा दर १००० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ मे रोजी २६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वांग्याची ९ मे रोजी ५१ क्‍विंटल आवक झाली. त्यास ७०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ मे रोजी वांग्याची आवक ३३ क्‍विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३ मे रोजी १७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बुधवारी (ता. १५) २३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सोलापुरात सर्वाधिक २००० रुपये
 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याला चांगली मागणी राहिली. वांग्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक २००० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. 
बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात वांग्याची आवक रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत झाली. त्याचा दर प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, सरासरी ८०० आणि सर्वाधिक २००० रुपये असा मिळाला. या आधीच्या सप्ताहात हाच दर प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये, सरासरी १००० आणि सर्वाधिक १८०० रुपयांवर होता. तर आवक रोज १० ते २० क्विंटलपर्यंत होती. 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आवक एकदमच कमी १० ते १५ क्विंटलपर्यंत झाली. दर प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये इतका मिळाला. या सप्ताहात पुन्हा त्याच्या आवकेत घट झाली. पण दर मात्र १००- २०० रुपयांच्या फरकाने स्थिर आणि टिकून राहिले.

परभणीत १२००  ते ३००० रुपये

परभणी  येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १६) वांग्याची ४५ क्विंटल आवक होती. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, इटलापूर, बोरवंड आदी गावांतून वांग्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी वांग्याची ३० ते ४० क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल १२०० ते ४००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १६) वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये, तर किरकोळ विक्रीचे दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपये राहिले, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

अकोल्यात १०००  ते २००० रुपये 
अकोला येथील बाजारात सध्या वांग्यांना मागणी वाढली आहे. या भागात लग्नसराई जोरात असल्याने वांगी प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये क्विंटल दराने विक्री होत आहेत. किरकोळ बाजारात वांगी ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. 

येथील जनता भाजी बाजारात अकोल्यासह लगतच्या भागांतून वांग्यांची आवक होत आहे. सध्या दीड ते दोन टनांपेक्षा अधिक आवक होत आहे. दुय्यम दर्जाची वांगी १००० ते १५०० रुपयांदरम्यान विक्री होत आहेत. उत्तम दर्जाची वांगी १५०० ते २००० रुपयांदरम्यान विक्री होत असल्याचे व्यापारी सुत्रांकडून सांगण्यात आले.  दुय्यम दर्जाची वांगी सरासरी १२०० व उत्कृष्ट दर्जाची १८०० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहेत. हे दर या महिन्यात टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

नगर येथे ५०० ते ३००० रुपये  
 नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १६) शकुंतल वांग्याची ३९ आवक झाली. त्यास ५०० ते ३००० रुपये व सरासरी १७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नगर बाजार समितीत वांग्याची आवक आणि दरही गेल्या महिनाभराच्या तुलनेत स्थिर आहेत.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची सरासरी १०० क्‍विंटलपर्यंत आवक होते. गुरुवारी ३९ क्विंटलची आवक झाली. नऊ मे रोजी ७२ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. 

दोन मे रोजी ८६ क्विंटल आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. १८ एप्रिल रोजी ६२ क्विंटलची आवक झाली. त्यास ५०० ते २५०० व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. 

२५ एप्रिल रोजी ७० क्विंटल आवक होऊन ५०० ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये...सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटोची आवक वाढतीचकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील...