कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती

देवळा, जि. नाशिक: मृत कोंबडी पक्षांची विल्हेवाटाची सोय व त्यातून मिळणारे गॅसरूपी इंधन, यामुळे येथील अनेक कुक्कुटपालक बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देत आहेत.
Eggplant filling in Jalgaon is Rs. 1800 to 2600 per quintal
Eggplant filling in Jalgaon is Rs. 1800 to 2600 per quintal

देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची विल्हेवाटाची सोय व त्यातून मिळणारे गॅसरूपी इंधन, यामुळे येथील अनेक कुक्कुटपालक बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देत आहेत. प्रदूषणास आळा बसत असल्याने लॉन्सधारकही आता बायोगॅस संयंत्र बसवू लागले आहेत.

 नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस संयंत्र उभारणी केली जाते. विशेष म्हणजे त्याला १७ हजार रुपये अनुदान आहे. शौचालय जोडणी केल्यास आणखी एक हजार ६०० रुपये जास्तीचे अनुदान आहे. १२ बाय १० फूट एवढ्या जागेवर आरसीसी रचनेत हा प्लांट बांधला जातो. यात गायी-गुरांच्या शेण, मलमूत्रासह इतर ओले खत, उष्टे-शिळे अन्न, पोल्ट्रीतील मृत पक्षी यात टाकून गॅसरूपी इंधन मिळवता येते. विशेष म्हणजे यापासून फळबागेसाठी व इतर शेतीसाठी उत्कृष्ट प्रकारची स्लरी व खत मिळते. जे पिकांना तत्काळ लागू होते.

कसमादे पट्ट्यात कुक्कुटपालन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोंबडी पक्षी मोठे करत असताना काही पक्षी रोगास बळी पडतात. त्यांची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान या व्यावसायिकांपुढे असते. खड्डा खोदून पुरणे हाच एक पर्याय असला तरी, काहीवेळा ते इतरत्र फेकले जातात. यामुळे वातावरणात प्रदूषण होते. यावर पर्याय म्हणून कुक्कुटपालकांनी बायोगॅसला पसंती दिली आहे.

दरम्यान, या भागातील मंगल कार्यालय, लॉन्सधारकांनी बायोगॅस संयंत्रास पसंती दर्शवत बांधकामे करून घेतली आहेत. लग्नसमारंभ वा इतर कार्यक्रमाप्रसंगी उरलेले उष्टे व शिळे अन्नपदार्थांची यात विल्हेवाट सहज लावता येते. 

असे मिळते अनुदान 

जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात १४० बायोगॅस संयंत्र उभारण्यात आले. २०१९-२० मध्ये २५२, तर २०२०-२१ मध्ये २६५ पेक्षा जास्त बायोगॅस प्लांट उभी राहणार आहेत. केंद्र शासनाकडून १२ हजार रुपये (अनुसूचित जाती-जमातीसाठी १३ हजार) व जिल्हा परिषद सेसअंतर्गत पाच हजार रुपये अनुदान मिळते. त्यासाठी सात-बारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, अर्जांची पूर्तता करणे आवश्यक असते.

कुक्कुटपालन व्यवसाय करताना मृत पक्ष्यांची विल्हेवाट कशी करायची, असा प्रश्‍न असायचा. परंतु, आता या बायोगॅस संयंत्रामुळे तो सुटला आहे. शिवाय गॅसरुपी इंधन मिळत असल्याने आर्थिक बचत होत आहे.  - भरत चव्हाण, कुक्कुटपालक, मेशी, ता. देवळा.   लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमात नाही म्हटले, तरी थोडेफार उष्टे व शिळे अन्न टाकावेच लागते. इतरत्र टाकले, तर प्रदूषण होते. त्यापेक्षा बायोगॅसच्या माध्यमातून एक चांगला पर्याय मिळाला आहे.  - अप्पा गुंजाळ, संचालक, तुळजाई लॉन्स, देवळा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com