नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा कायम

नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात वांगी, फ्लॉवरसह अन्य पालेभाज्यांच्या दरात तेजी कायम राहिली.
Eggplant to the Nagar, of the flower Rate improvement continues
Eggplant to the Nagar, of the flower Rate improvement continues

नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात वांगी, फ्लॉवरसह अन्य पालेभाज्यांच्या दरात तेजी कायम राहिली. वांग्याची २२ ते २५ क्विंटल दर दिवसाला आवक होऊन ५ हजार ते ९ हजार ९००, फ्लॉवरची दर दिवसाला ४० ते ४५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६ हजाराचा दर मिळाला. बटाट्याची दर दिवसाला २५० ते २७५ क्विंटलची आवक होत होती. बटाट्याला प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपयांचा दर मिळाला. 

टोमॅटोची २०० ते २१० क्विंटलची दर दिवसाला आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कोबीची ७५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, काकडीची ४३ ते ४५ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते १६००, गवारीची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ८ हजार, घोसाळ्याची २ ते ५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, दोडक्याची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार, भेंडीची २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ७ हजार रुपये दर मिळाला.

पालेभाज्यात कोथिंबिरीच्या दर दिवसाला १४०० ते १५०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्यांना २०० ते ५००, पालकाच्या ६०० जुड्यांची आवक होऊन ८०० ते १०००, करडी भाजीच्या ४०० ते५०० जुड्याची आवक होऊन ८०० ते १ हजार रुपये दर मिळाला.

मोसंबीला एक हजार ते चार हजाराचा दर 

नगर बाजार समितीत फळांचीही चांगली आवक होत आहे. मोसंबीची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजाराचा प्रतिक्विंटल दर मिळाला. संत्र्यांना २ हजार ते ६ हजार, डाळिंबाला २ हजार ते १३ हजार, पपईला १ हजार ते २ हजार ५००, सीताफळांची ४ ते ५ क्विंटलची आवक होत आहे. १ हजार ते ५ हजार, चिकुला १ हजार ते ३ हजार, पेरूला १ हजार ते २५०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com