नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक ४४५० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ५००० रूपये दर मिळाला.
Eggplant in Nashik 2000 to 5000 rupees
Eggplant in Nashik 2000 to 5000 rupees

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक ४४५० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ५००० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ५९४० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

शेतमालाची आवक सर्वसाधारण असून सध्या दरात सुधारणा आहे. ढोबळी मिरचीची आवक ३०४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल ३७५० ते ५६२५ असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ४३७५ रूपये राहिला. फ्लॉवरची आवक ६१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४२९ ते १६७९ दर मिळाला. त्यास सरासरी दर १३६७ राहिला. कोबीची आवक ८२८ क्विंटल झाली. तिला ५०० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २०८३ रूपये राहिले. 

भोपळ्याची आवक ९०० क्विंटल होती. त्यास १३३३ ते २६६७ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रूपये राहिला. कारल्याची आवक ४६८ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३३३३ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २९१६ राहिला. दोडक्याची आवक २४० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५८३३ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ४१६७ राहिला. गिलक्याची आवक ७२ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ४१६७ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३३ रूपये राहिला. 

भेंडीची आवक ३६ क्विंटल झाली. त्यास १६६७ ते ३३३३ दर मिळाला. सर्वसाधारण दर २५५० राहिला. हिरवी मिरचीची आवक ७४ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० राहिला. काकडीची आवक १३०० क्विंटल झाली. तिला १५०० ते २२५०  असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० राहिला. 

कांद्याची आवक १९६१ क्विंटल झाली. त्यास ५०० ते २७०१, तर सर्वसाधारण दर २३०० राहिला. बटाट्याची आवक ३६५ क्विंटल झाली. तिला १९०० ते २८०० तर, सर्वसाधारण दर २३०० राहिला. लसणाची आवक ५६  क्विंटल झाली. तिला ५६०० ते १०५००, तर सर्वसाधारण दर ८६०० राहिला. 

डाळिंब ३०० ते १०२५० रूपये

फळांमध्ये डाळिंबांची आवक १३६४ क्विंटल झाली. त्यास ३०० ते १०२५० दर होता. सर्वसाधारण दर ६५०० राहिला. मोसंबीची आवक १०० क्विंटल झाली. तिला १८०० ते ४००० दर राहिला. सर्वसाधारण दर २८०० राहिला. केळीची आवक १० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० राहिला. पपईची आवक २९ क्विंटल झाली. तिला ९०० ते १८०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com