नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची २३५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १००० ते २२५० असा दर होता. त्यास सरासरी दर १७०० राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Eggplant in Nashik costs Rs. 1000 to 2250 per quintal
Eggplant in Nashik costs Rs. 1000 to 2250 per quintal

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची २३५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १००० ते २२५० असा दर होता. त्यास सरासरी दर १७०० राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

फ्लॉवरची आवक ४४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५७० ते १३५५ दर होता. सरासरी दर १०७० राहिला. कोबीची आवक ५१८ क्विंटल झाली. तिला सरासरी ५०० ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ८३० राहिले. ढोबळी मिरचीची आवक १८३ क्विंटल झाली. तिला २८१० ते ४६८५ दर होता. सर्वसाधारण दर ३७५० राहिला. 

भोपळ्याची आवक ६१५ क्विंटल होती. त्यास ३३० ते १०६५ असा दर होता. सर्वसाधारण दर ८०० राहिला. कारल्याची आवक २३७ क्विंटल झाली. त्यास ५८० ते १४६० असा दर होता. सर्वसाधारण दर १०४० राहिला. दोडक्याची आवक ६६ क्विंटल झाली. त्यास १६६५ ते ३३३० दर होता. त्यास सर्वसाधारण दर २७१० राहिला. गिलक्याची आवक ३६ क्विंटल होती. त्यास ८३० ते १६६५ दर होता. सर्वसाधारण दर १२५० रूपये राहिला. 

भेंडीची आवक ७५ क्विंटल झाली.त्यास ७५० ते १२८० दर होता.सर्वसाधारण दर १०८० राहिला.हिरवी मिरचीची आवक १३० क्विंटल झाली. तिला २००० ते ४००० असा दर होता.सर्वसाधारण दर ३००० राहिला.काकडीची आवक ७९० क्विंटल झाली.तिला ३०० ते ८५० असा दर होता. सर्वसाधारण दर ६०० राहिला.  कांद्याची आवक २२४० क्विंटल झाली. त्यास २०० ते ७५० दर होता.

सर्वसाधारण दर ५०० राहिला. बटाट्याची आवक १४६० क्विंटल झाली. त्यास २१०० ते २६०० दर होता. सर्वसाधारण दर २२५० होता. लसणाची आवक ३१ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ५५०० ते ११००० दरम्यान होता. सरासरी दर ८००० होता. आल्याची आवक ४० क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ५००० ते ८००० दरम्यान होता. सरासरी दर ६५०० रूपये होता. 

फळांचे दर असे 

फळांमध्ये डाळिंबांची आवक १८७५ क्विंटल झाली. त्यास ४०० ते ६५०० दर होता. सर्वसाधारण दर ४२५० राहिला. मोसंबीची आवक २० क्विंटल झाली. तिला १८५० ते ४००० दर होता. सर्वसाधारण दर २९०० राहिला. केळीची आवक ३०० क्विंटल झाली. तिला ५५० ते ११०० दर होता. सर्वसाधारण दर ८५० राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com