Agriculture news in marathi Eggplant in the state averages Rs. 1500 to 8000 | Agrowon

राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.१४) रोजी वांग्यांची आवक ५११ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ५५०० रुपये, तर सर्वसाधारण दर ४००० रुपये होते.

नाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.१४) रोजी वांग्यांची आवक ५११ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ५५०० रुपये, तर सर्वसाधारण दर ४००० रुपये होते. ही या सप्ताहात झालेली उच्चांकी आवक असून दरातही सुधारणा कायम आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत सध्या होणारी वांग्यांची आवक चांगली आहे. उठाव असल्याने दरात तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवार (ता.१३) रोजी वांग्यांची आवक ५१२ क्विंटल झाली. त्यास ४००० ते ७००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रूपये होता. सोमवार (दि.१२) रोजी वांग्याची आवक ५३१ क्विंटल झाली. त्यास ३००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५०० होता.

रविवारी (ता.११) वांग्यांची आवक ५५८ क्विंटल झाली. त्यास ३५०० ते ७००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० होता. शनिवार (ता.१०) रोजी वांग्याची आवक ५६० क्विंटल झाली. त्यास ३५०० ते ६१०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४८०० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्यांची आवक सर्वसाधारण होती. आवकेच्या तुलनेत दरात चढ उतार होताना दिसून येत आहे.

औरंगाबादमध्ये सरासरी १८५० रूपये

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १५) वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना १२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर, सरासरी दर १८५० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ८ ऑक्टोबरला ३४ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांन १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर राहिले. सरासरी १५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. १० ऑक्‍टोबरला २५ क्विंटल आवक, तर दर १००० ते १९००, सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. ११ ऑक्टोबरला ३३ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर १२०० ते २०००, सरासरी १६०० रुपये मिळाला. १२ ऑक्टोबरला २७ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ५०० ते १५०० रुपये, सरासरी १००० रुपये राहिले.

 १३ ऑक्टोबरला १६ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर १००० ते १८००, सरासरी दर १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ ऑक्टोबरला १५ क्विंटल आवक झाली. १४०० ते २००० रुपये, सरासरी दर १७०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सांगलीत ८००० रूपये क्विंटल

सांगली : येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. १५) वांग्यांची २० ते २५ क्रेट (एक क्रेट २० किलोची) आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस ७०० ते ९०० तर सरासरी ८०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने बाजारात वांग्यांची आवक घटली आहे.

दरात वाढ झाली आहे. बुधवारी (ता. १४) वांग्याची २० ते २५ क्रेट आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ७०० ते ९०० तर सरासरी ८०० रुपये असा दर मिळाला.

मंगळवारी (ता. १३) वांग्यांची ३० ते ३५ क्रेट आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ६०० ते ८००, तर सरासरी ७५० रुपये असा दर होता. गत सप्ताहात वांग्यांची आवक १०० ते १५० क्रेट आवक होत होती. मात्र, पावसाने वांग्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तर, शेतात पाणी साचल्याने वांगी काढण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे वांग्यांच्या आवकेत घट झाली. प्रतिकिलोस २० ते ३० रुपयांनी दरात वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नगरमध्ये २५०० ते ३५०० रुपये

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१५) २४ क्विंटल वांग्यांची आवक झाली. प्रतिक्विवंटल वांग्यांना २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये व ३ हजार रुपये सरासरी दर मिळाला. 

नगरमध्ये दररोज २० ते ३० क्विंटल वांग्यांची आवक होत असते. मंगळवारी (ता. १३) २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार व सरासरी ३ हजार रुपयांचा दर मिळाला. सोमवारी (ता. १२) २४ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार व सरासरी ३ हजार रुपयांचा दर मिळाला. शनिवारी (ता. १०) २६ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५०० व सरासरी २ हजार ७५० रुपयांचा सरासरी दर आहे. गेल्या आठ दिवसांपासून  जिल्ह्यात वांग्यांचेचे दर तेजीत आहेत.

परभणीत सरासरी ६००० रूपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१५) वांग्यांची ८ क्विंटल आवक होती. वांग्यांना प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ७००० रुपये, तर सरासरी ६००० रुपये दर मिळाले. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, कोक आदी गावातून वांग्यांची आवक होत आहे.

पावसामुळे या  आठवड्यात आवक कमी झाली आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ८ ते ३० क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटल २२०० ते ७००० रुपये, तर सरासरी ४६०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१५) वांग्यांची ८ क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ५००० ते ७००० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिक्विंटल ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सोलापुरात सरासरी १५०० रूपये दर 

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्यांना चांगला उठाव मिळाला. वांग्यांना प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्यांची रोज १५ ते २० क्विंटलपर्यंत आवक राहिली. वांग्याची आवक स्थानिक भागातूनच झाली. मागणी आणि आवक यांच्यातील तफावतीमुळे दरात मात्र तेजी राहिली. या सप्ताहात वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही वांग्याची आवक प्रतिदिन अगदीच जेमतेम १०  ते २० क्विंटल अशी राहिली. 

वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान ११०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. त्या आधीच्या सप्ताहातही आवक अगदीच कमी प्रतिदिन १० ते १२ क्विंटलपर्यंत राहिली. दर प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा राहिला. प्रतिक्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांच्या फरकाने चढ-उतार वगळता दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

जळगावात १८०० ते २८०० रुपये दर

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लहान काटेरी वांग्यांची आवक गेले तीन महिने कमी आहे. गुरुवारी (ता.१५) १४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये, तर सरासरी २५०० रूपये दर होता. आवक जामनेर, एरंडोल, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे.

आवक कमी व उठाव बऱ्यापैकी असल्याने दरही टिकून आहेत. भरीताच्या वांग्यांची आवक सध्या वाढली आहे. मागणीदेखील बऱ्यापैक असल्याने दर स्थिर आहेत. भरीताच्या वांग्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर आहे.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...