Agriculture news in marathi Eggplant in the state is Rs.500 to Rs.4000 per quintal | Agrowon

राज्यात वांगी ५०० ते ४००० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 जुलै 2021

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १५) वांग्यांची सुमारे ६ टेम्पो आवक झाली. या वेळी दहा किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. आवक प्रामुख्याने पुणे, नगर, सोलापूर, सातारा परिसरातून होत आहे. सध्या खरिपाचे उत्पादन सुरळीत झाल्याने आवकेत वाढ झाली आहे. 

पुण्यात प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १५) वांग्यांची सुमारे ६ टेम्पो आवक झाली. या वेळी दहा किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. आवक प्रामुख्याने पुणे, नगर, सोलापूर, सातारा परिसरातून होत आहे. सध्या खरिपाचे उत्पादन सुरळीत झाल्याने आवकेत वाढ झाली आहे. 

सोलापुरात प्रतिक्विंटलला ५०० ते ३२०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्यांची आवक जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिले. वांग्यांना प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३२०० रुपये इतका दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्यांची रोज ३० ते ४० क्विंटल आवक राहिली. वांग्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच राहिली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात आवकेचे प्रमाण काहीसे असेच रोज ४० ते ५० क्विंटलपर्यंत राहिले. पण मागणी असल्याने त्याला चांगला उठाव मिळाला. साहजिकच दरही टिकून राहिले. 

वांग्यांना किमान ६०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. त्या आधीच्या सप्ताहातही आवकेत आणि दरात किंचित चढ-उतार राहिला. बाकी दर मात्र टिकून होते. प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

परभणीत क्विंटलला २५०० ते ४००० रुपये

परभणी ः ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १५) वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ४००० रुपये, तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले’’, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, आर्वी आदी गावातून तसेच जिंतूर, पाथरी आदी तालुक्यांतून वांग्यांची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी सरासरी १५ ते ४० क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपये दर होते. ‘‘गुरुवारी (ता.१५) वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने झाली’’, असे व्यापारी प्रकाश बोरोडे यांनी सांगितले.

जळगावात प्रतिक्विंटलला १४०० ते २००० रुपये 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत लहान काटेरी वांग्यांची आवक स्थिर आहे. गुरुवारी (ता. १५) १९ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २००० व सरासरी १८०० रुपये मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, जळगाव, यावल, चोपडा आदी भागातून होत आहे. 

औरंगाबादमध्ये क्विंटलला ८०० ते १२०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १५) वांग्यांची २९ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ८ जुलै रोजी ३३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे सरासरी दर ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० जुलै रोजी ३० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना सरासरी १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ जुलै रोजी ३४ क्‍विंटल आवक झाली. त्यावेळी वांग्यांचे सरासरी दर ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ जुलै रोजी २१ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ जुलै रोजी वांग्यांची आवक २३ क्‍विंटल, तर दर सरासरी ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ जुलै रोजी २१ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी वांग्यांना सरासरी ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नांदेडमध्ये प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये 

नांदेड : नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडानाका बाजारात दररोज भाजीपाला बाजार भरतो. या ठोक बाजारात सध्या स्थानिक शेतकऱ्यांची ४० ते ५० क्विंटल वांगी विक्रीसाठी येत आहेत. यास १५०० ते २००० हजार रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली.

सध्या बाजारात वांग्यांची आवक वाढल्यामुळे दर स्थिर झाले आहेत. शहरातील तरोडानाका तसेच इतवारा भागात भाजीपाल्यांचा लिलाव होतो. सध्या दररोज ते ४० ते ५० क्विंटल वांगी विक्रीसाठी येत आहेत. यास १५०० ते २००० रुपये दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो प्रमाणे विक्री होत असल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली. सध्या पावसाळा असल्यामुळे आवकेत घट झाली आहे. त्यामुळे दरात किंचित वाढ झाली आहे.

नाशिकमध्ये क्विंटलला ७०० ते २००० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता. १४) रोजी वांग्यांची आवक ४०३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २,००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १,५०० रुपये होते. सप्ताहात आवक वाढलेली आहे. दर स्थिर असल्याचे दिसून आले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सध्या होणारी वांग्यांची आवक मागणीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शेतमालाला उठाव कमी आहे.  दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.१३) वांग्यांची आवक ३८६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते २,००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १,५०० रूपये होता. सोमवारी (ता.१२) वांग्यांची आवक ४१० क्विंटल झाली. त्यास १,२०० ते २,०५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १,५०० रुपये होता.

रविवारी (ता. १२) वांग्यांची आवक ४५३ क्विंटल झाली. त्यास १,००० ते २,५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १,५०० रुपये होता. शनिवारी (ता.१०) वांग्यांची आवक २९४ क्विंटल झाली. त्यास ५०० ते २,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १,३०० रुपये होता.

शुक्रवारी (ता.९) वांग्यांची आवक ३८८ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १,५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०० रुपये होता. गुरुवारी (ता. ८) वांग्यांची आवक २२१ क्विंटल झाली. त्यास २,५०० ते ३,५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,००० रुपये होते.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...