Agriculture news in marathi, Eggplant, tomato prices improve in Solapur | Agrowon

सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, टोमॅटोची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, टोमॅटोची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात प्रतिदिन वांग्यांची ३० ते ५० क्विंटल आणि टोमॅटोची १०० ते २०० क्विंटलपर्यंत आक राहिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आवकेत तूट होतीच. पण दरातही घसरण सुरु होती. पण गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत थोडासा चढ-उतार असला, तरी दर मात्र चांगलेच तेजीत आहेत. वांगी, टोमॅटोची आवक स्थानिक भागातूनच झाली.

वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये तर सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. 

त्याशिवाय गवार, भेंडी, दोडक्यालाही चांगली मागणी राहिली. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. पण दर टिकून राहिले. रोज प्रत्येकी ४० ते ६० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवारीला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये, भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर दोडक्याला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीचे दरही काहीसे स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
लातूर बाजार समितीमध्ये कोबी, फ्लॉवर,...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर...
गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर  नगर ः नगर येथील दादा पाटील...
काकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...
Top 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
Top 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...
जालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर  : नगर येथील दादा पाटील...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...
रब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...
पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
लातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...
राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...