agriculture news in Marathi, eggs and chicken will be costly due to maize scarcity, pune, maharashtra | Agrowon

मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन महागणार
दिपक चव्हाण
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे खरीप हंगामात मक्याच्या उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोल्ट्रीचा प्रमुख कच्चा माल असलेल्या मक्याचा तुटवडा असाच कायम राहिला, तर अंडी आणि चिकनचे उत्पादनही अडचणीत येईल. पर्यायाने पुढे, चिकन अंड्याच्या बाजारभावात वाढ होऊन प्रथिन सुरक्षेचाही प्रश्न तयार होणार आहे. शिवाय महागाईतही भर पडणार आहे. मध्यमवर्गासह गरिबांसाठी अंडी आणि चिकन हा स्वस्त प्रथिनांचा स्रोत आहे.

पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे खरीप हंगामात मक्याच्या उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोल्ट्रीचा प्रमुख कच्चा माल असलेल्या मक्याचा तुटवडा असाच कायम राहिला, तर अंडी आणि चिकनचे उत्पादनही अडचणीत येईल. पर्यायाने पुढे, चिकन अंड्याच्या बाजारभावात वाढ होऊन प्रथिन सुरक्षेचाही प्रश्न तयार होणार आहे. शिवाय महागाईतही भर पडणार आहे. मध्यमवर्गासह गरिबांसाठी अंडी आणि चिकन हा स्वस्त प्रथिनांचा स्रोत आहे.

मक्यावर आधारित पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांचा कच्चा माल महागला असून, दोन्ही व्यवसाय शॉर्ट मार्जिनच्या चक्रात सापडले आहेत. लष्करी अळीच्या संकटामुळे एकाच वेळी मका उत्पादक शेतकरी, पशुखाद्य कंपन्या, पोल्ट्री व्यावसायिक, स्टार्च उद्योग, मका आधारित अन्नप्रक्रिया उद्योग अशी एकूणच साखळी अडचणीत आली आहे. देशातील एकूण उत्पादनातील ५५ टक्के मका पोल्ट्री उद्योगासाठी तर २० टक्के मका स्टार्च उद्योगासाठी वापरला जातो.

पंजाबसह उत्तर भारतात दैनंदिन आहारातही देशी वाणाच्या मक्याचा उपयोग केला जातो. देशांतर्गत एकूण सरासरीच्या उत्पादनाच्या सुमारे दहा टक्के मका मानवी आहारात जातो. उशिरा पावसामुळेही मक्याचा हंगाम एक महिना पुढे ढकलला गेला आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे आधीच उत्पादनात तूट असताना हंगाम लांबणीवर पडल्याचा अतिरिक्त ताण एंड यूजरवर निर्माण झाला आहे.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...