agriculture news in Marathi eight a and ferfar certificate available online Maharashtra | Agrowon

बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट उपलब्ध 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे राज्यभर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे बॅंकांना आता आठ-अ व फेरफार उतारे थेट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे राज्यभर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे बॅंकांना आता आठ-अ व फेरफार उतारे थेट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे हेलपाटे कमी झाले आहेत. 

लॉकडाउनच्या काळात सतत कार्यरत होता. खरीप कर्जवितरणासाठी शेतकऱ्यांना सातबाराची आवश्यकता भासणार असल्याचे गृहीत धरून जमाबंदी आयुक्तालयाचा ई-फेरफार प्रकल्प सतत कार्यरत राहिला. शेतकऱ्यांना लॉकडाउनमध्ये तलाठी कार्यालयात जाणे अवघड होते. मात्र, कर्ज वितरणासाठी बॅंकांना सातबारा अत्यावश्यक होता. यामुळे शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेण्याऐवजी थेट बॅंकांनी महसुल विभागाकडूनच ऑनलाइन कागदपत्रे घ्यावी, असा प्रयत्न या प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी केला. 

‘‘आम्ही दहा बॅंकांना शेतकऱ्यांचे सातबारा उतारे थेट दिलेच पण आता आठ-अ व फेरफार उतारे देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाचला आहे. शेतकऱ्यांऐवजी थेट राज्य शासनाकडून सातबारा उतारा घेण्याच्या सूचना बॅंकांना देण्यात आल्या. त्यासाठी बॅंकांना महसुल विभागासोबत करार करावा लागतो. असा करार आतापर्यंत दहा बॅंकांनी केला असून अजून चार बॅंका करार करणार आहेत,’’ अशी माहिती जगताप यांनी दिली. 

सातबारा उतारा, आठ-अ किंवा फेरफार उतारा देण्यासाठी आता शेतकऱ्याने बॅंकेत किंवा तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शेतकरी इतर कामासाठी या कार्यालयांशी संपर्क साधू शकतात मात्र या तीन उताऱ्यांबाबत बॅंका आता थेट शासनाकडून अधिकृत दस्तावेज प्राप्त करून घेत आहेत. त्यामुळे कर्ज वितरण जलद व पारदर्शक होण्यास मदत मिळते आहे. 

शेतकऱ्यांना कोणत्याही उताऱ्यासाठी बॅंकेत किंवा तलाठ्याकडे जाण्याची वेळ येवू नये, असा प्रयत्न राज्य शासनाचा आहे. ‘‘बॅंकांनी विविध उतारे थेट शासनाकडून घेण्यासाठी ३१ मेपर्यंत राज्य शासनाशी करार करावेत,’’ असे आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी २६ फेब्रुवारीला राज्यातील सर्व बॅंकांना दिले होते. तथापि, लॉकडाउनमुळे काही बॅंकांना अडचणी आल्या. आता लॉकडाउन शिथिल झाल्याने ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. 

लॉकडाउनच्या काळात वाटलेले दस्तावेज 

  • तलाठ्यांकडून वाटले गेलेले ऑनलाइन सातबारा उतारे- ६३.७६ लाख 
  • शेतकऱ्यांनी मिळवलेले डिजिटल सातबारा उतारे-३.३२ लाख 
  • बॅंकांनी शेतकऱ्यांऐवजी थेट शासनाकडून घेतलेले उतारे- ५२ हजार 
  • शेतकऱ्यांऐवजी शासनाकडून उतारे मिळवणाऱ्या बॅंका – दहा 
  • ऑनलाइन उतारे मिळण्यासाठी करारनाम्याच्या प्रक्रियेत असलेल्या बॅंका- चार 
     

इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...