परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे आठ लाख पाकिटांची विक्री

परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध पिकांच्या ६४ हजार १६४ क्विंटल बियाण्यांची, तसेच कपाशी बियाण्याच्या ८ लाख ५५ हजार ६०० पाकिटांची विक्री झाली.
Eight and a half lakh packets of cotton seeds sold in Parbhani district
Eight and a half lakh packets of cotton seeds sold in Parbhani district

परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध पिकांच्या ६४ हजार १६४ क्विंटल बियाण्यांची, तसेच कपाशी बियाण्याच्या ८ लाख ५५ हजार ६०० पाकिटांची विक्री झाली. एकूण १ हजार ७०७ क्विंटल बियाणे आणि कपाशीच्या बियाण्यांची १ लाख ९१ हजार १४६ पाकिटे शिल्लक राहिली आहेत. विविध ग्रेडच्या एकूण ८५ हजार ३४८ टन खताची विक्री झाली, अशी माहिती जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा सरासरी ५ लाख ३८ हजार ७०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित होती. त्यासाठी विविध पिकांच्या ८७ हजार १७१ क्विंटल बियाण्याची, तर कपाशी बियाण्याच्या ११ लाख ४३ हजार ८८९  पाकिटांची मागणी होती. सार्वजनिक कंपन्यांनी ५ हजार ५६२ क्विंटल आणि खाजगी कंपन्यांनी ६० हजार ३१० क्विंटल असे एकूण  ६५ हजार ८७२ क्विंटल बियाण्याचा तसेच  कपाशीच्या १० लाख ४८ हजार ३४६ बियाणे पाकिटांचा पुरवठा केला. 

एकूण ६४ हजार १६४ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. त्यात ज्वारीची २९५ क्विंटल, बाजरीचे ४ क्विंटल, मक्याचे १०० क्विंटल, तुरीचे २ हजार ६०५ क्विंटल, मूगाचे १ हजार ३४१ क्विंटल, उडदाच्या २८८ क्विंटल, सोयाबीनच्या ५९ हजार ५३० क्विंटल, तीळाचे १ क्विंटल बियाण्याची तसेच कपाशीच्या बियाण्याच्या ८ लाख ५५ हजार ६०० पाकिटांची विक्री झाली. 

शिल्लक बियाण्यामध्ये ज्वारीचे ११६ क्विंटल, बाजरीचे २६ क्विंटल, मक्याचे १०० क्विंटल, तुरीचे ४२० क्विंटंल, मुगाचे ८७० क्विंटल, उडदाचे ९९ क्विंटल, तीळाचे २ क्विंटल, सुर्यफुलाच्या ४ क्विंटल, सोयाबीनच्या ७० क्विंटल बियाण्याचा तसेच कपाशीच्या १ लाख ९१ हजार १४६ पाकिटांचा समावेश आहे.

८५ हजार ३४८ टन खताची विक्री

यंदा १ लाख ५१ हजार २०० टन खतांची मागणी होती. परंतु, ९१ हजार १७० टन एवढा खतासाठा मंजुर करण्यात आला. गतवर्षीचा २४ हजार ७७१ टन खतसाठा शिल्लक होता. सोमवार (ता.१०) पर्यंत ६६ हजार ८१ टन खतांचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण  ९० हजार ८५२ टन खतांची उपलब्धता झाली. सोमवार (ता.१०) पर्यंत एकूण ८५ हजार ३४८ टन खतांची विक्री झाली.  युरिया २९ हजार ७९० टन, सुपर फास्फेट ७ हजार ९१० टन, पोटॅश ३ हजार ९२० टन, अमोनियम सल्फेट २८ टन , डिएपी ११ हजार ९०० टन, संयुक्त खते (एनपीके ) ३१ हजार ८०० टन या खतांचा त्यात समावेश आहे. शिल्लक खतांमध्ये युरिया ४५ टन, सुपर फास्फेट ६०१  टन, पोटॅश ९०३ टन, डिएपी १ हजार ४५३ टन, संयुक्त खते (एनपीके )२ हजार १०२ टन या खतांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एच. एम. ममदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com