धान उत्पादकांसाठी ‘आठ अ’ चा निकष रद्द ः छगन भुजबळ

'Eight A' criteria for paddy growers canceled: Chhagan Bhujbal
'Eight A' criteria for paddy growers canceled: Chhagan Bhujbal

नागपूर ः भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत हमीभाव केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे ‘आठ अ’ची सक्‍ती केली जाणार नाही, अशी घोषणा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (ता. १८) विधान परिषदेत केली. त्यासोबतच २२ कोटी रुपयांचे थकीत चुकारेही येत्या काही दिवसांत केले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील धान उत्पादकांना हमीभाव केंद्रावर धान विकताना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत विधान परिषदेचे सदस्य रामदास आंबटकर यांनी लक्षवेधी मांडली होती. धान उत्पादकांना ‘आठ अ’ची सक्‍ती करू नये त्यासोबतच थकीत चुकारे करण्यात यावे, अशी मागणी त्याव्दारे करण्यात आली. 

भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत धान खरेदीपोटी ५४ कोटी ४५ लाख रुपयांचे चुकारे आजवर करण्यात आले. १३ कोटी ८० लाख रुपयांचे चुकारे बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित थकीत असलेली २२ कोटी रुपयांची रक्‍कम येत्या काळात बॅंक खात्यात जमा केली जाईल, असे छगन भुजबळ यांनी उत्तरात सांगितले. त्यासोबतच ‘आठ अ’ उताऱ्याची सक्‍ती केली जाणार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. 

शासनाकडून १५८० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर धानाला दिला जात आहे. त्यासोबतच ५०० रुपये बोनस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. धान उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हे सारे प्रयत्न शासनस्तरावरून केले जात आहेत. मॉन्सूनोत्तर पावसामुळे धान उत्पादकांचे झालेल्या नुकसानीबाबतही असेच निर्णय गरजेनुसार घेतले जातील, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com