पुणे : चारा छावण्यांचे आठ कोटी रुपये थकले

Eight crore rupees of fodder tents were exhausted
Eight crore rupees of fodder tents were exhausted

पुणे ः दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनामार्फत बारामती तालुक्यातील अनेक संस्थांनी चारा छावण्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या संस्थांनी उपाययोजनाही केल्या होत्या. ज्या संस्थांनी ही कामे केली होती त्यांना मात्र पैशांसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. चारा छावण्या चालविणाऱ्या विविध संस्थांचे सुमारे आठ कोटी रुपये थकले आहेत. हे पैसे तातडीने मिळावे, अशी अपेक्षा या संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे. 

पाणीटंचाईमुळे दुष्काळात होरपळलेल्या जनावरांना व चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चारा छावण्यांमुळे दिलासा मिळाला होता. बारामती तालुक्यातील १८ हजार २३० जनावरे चारा छावण्यांमध्ये दाखल झाली होती. या छावण्यांचे एकूण सात कोटी ८९ लाख ९२ हजार रुपये शासनाकडे थकबाकी आहे. चारा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कालावधी गृहित धरून जनावरांच्या चारा छावण्या सप्टेंबरअखेर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार संस्था चालकांनी, मुर्टी, सुपे, देऊळगाव रसाळ, आंबी, जळगाव, पळशी, कऱ्हावागज, सावळ, ढाकाळे, उंडवडी अशा विविध ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

या संस्थांची शासनाकडे थकबाकी 
संस्था जनावरे संख्या थकबाकी  
धो. आ. सातव ऊर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल ट्रस्ट १४०० ३८ लाख रुपये 
माळेगाव साखर कारखाना २४८० १ कोटी ८७ लाख ५८ हजार रुपये 
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती १४५० ६४ लाख ७२ हजार ९७८ रुपये 
बारामती दूध संघ २९०० २ कोटी ५० लाख रुपये 
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १०,००० २ कोटी ५० लाख रुपये  

दुष्काळावर मात करण्यासाठी शासनामार्फत विविध संस्थांनी पुढाकार घेत चारा छावण्या सुरू केल्या होत्या. शासनामार्फत काही संस्थांना पैसे मिळाले आहे. परंतु, अजूनही जवळपास आठ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे, ती लवकर द्यावी, अशी अपेक्षा आहे.  - अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com