Agriculture news in Marathi, The eight dams in Sindhudurga are 100 per cent | Agrowon

सिंधुदुर्गतील आठ धरणांची पातळी १०० टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

कणकवली/सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे सिंधुदुर्गातील एक मध्यम, तर ७ लघू पाटबंधारे धरणांची पाणीपातळी शंभर टक्क्यांवर पोचली आहे. तिलारी मोठा प्रकल्प, ३ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि २८ लघू पाटबंधारे धरणांमधील आजचा पाणीसाठा ५३.७० टक्के झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पाऊसामुळे बहुतांशी छोटी धरणे भरून वाहू लागली आहेत. 

कणकवली/सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे सिंधुदुर्गातील एक मध्यम, तर ७ लघू पाटबंधारे धरणांची पाणीपातळी शंभर टक्क्यांवर पोचली आहे. तिलारी मोठा प्रकल्प, ३ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि २८ लघू पाटबंधारे धरणांमधील आजचा पाणीसाठा ५३.७० टक्के झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पाऊसामुळे बहुतांशी छोटी धरणे भरून वाहू लागली आहेत. 

सह्याद्री पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे देवगड तालुक्‍यातील कोर्लेसातंडी या मध्यम धरण प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच ल.पा.च्या आंबोली, हातेली, मांडखोल, निळेली, पावशी, हरकुळखुर्द, ओझरम आणि लोरे धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तिलारी या मोठ्या प्रकल्पात ५८.१५ टक्के, देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात ५३.७४, अरुणा १९ टक्के, तर उर्वरित लघू पाटंबधारे प्रकल्प धरणक्षेत्रांत सरासरी पावसात वाढ झाली आहे. शेतीकामे अंतिम टप्प्यात आहेत.

सद्य स्थितीत नोंदणीनुसार धरणांमध्ये एकूण ७७७.५३ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ४१७ द.ल.घ.मी. आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पात टक्केवारीप्रमाणे पाणीसाठा असा ः शिवडाव  ९८.९४, नाधवडे ६३.२६, ओटव ५०.८७, देदोनवाडी १०.२४, तरंदळे २८.६३, आडेली ७२.६७, चोरगेवाडी ४३.५९, ओरोसबुद्रुक १९.३७, सनमटेंब ९५.८२, तळेवाडी डिगस २५.८४, दाबाचीवाडी ४५.१५,शिरवल ६४.२१, पुळास ९५.३८, वाफोली ३७.७३, कारिवडे ३२.४९, धामापूर ४२.६५, ओसरगाव ५२.२०,  पोईप ७०.६८, शिरगाव १७.४५, तिथवली ५३.२२ टक्के इतका पाणी साठा झाला आहे.


इतर अॅग्रो विशेष
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...