महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
बातम्या
सिंधुदुर्गतील आठ धरणांची पातळी १०० टक्क्यांवर
कणकवली/सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे सिंधुदुर्गातील एक मध्यम, तर ७ लघू पाटबंधारे धरणांची पाणीपातळी शंभर टक्क्यांवर पोचली आहे. तिलारी मोठा प्रकल्प, ३ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि २८ लघू पाटबंधारे धरणांमधील आजचा पाणीसाठा ५३.७० टक्के झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पाऊसामुळे बहुतांशी छोटी धरणे भरून वाहू लागली आहेत.

सह्याद्री पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे देवगड तालुक्यातील कोर्लेसातंडी या मध्यम धरण प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच ल.पा.च्या आंबोली, हातेली, मांडखोल, निळेली, पावशी, हरकुळखुर्द, ओझरम आणि लोरे धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तिलारी या मोठ्या प्रकल्पात ५८.१५ टक्के, देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात ५३.७४, अरुणा १९ टक्के, तर उर्वरित लघू पाटंबधारे प्रकल्प धरणक्षेत्रांत सरासरी पावसात वाढ झाली आहे. शेतीकामे अंतिम टप्प्यात आहेत.
सद्य स्थितीत नोंदणीनुसार धरणांमध्ये एकूण ७७७.५३ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ४१७ द.ल.घ.मी. आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पात टक्केवारीप्रमाणे पाणीसाठा असा ः शिवडाव ९८.९४, नाधवडे ६३.२६, ओटव ५०.८७, देदोनवाडी १०.२४, तरंदळे २८.६३, आडेली ७२.६७, चोरगेवाडी ४३.५९, ओरोसबुद्रुक १९.३७, सनमटेंब ९५.८२, तळेवाडी डिगस २५.८४, दाबाचीवाडी ४५.१५,शिरवल ६४.२१, पुळास ९५.३८, वाफोली ३७.७३, कारिवडे ३२.४९, धामापूर ४२.६५, ओसरगाव ५२.२०, पोईप ७०.६८, शिरगाव १७.४५, तिथवली ५३.२२ टक्के इतका पाणी साठा झाला आहे.
- 1 of 916
- ››